डोंबिवलीत भररत्यावर स्वयंपाकाच्या गॅस रिफिलिंगचा धंदा; टेम्पो मालक ताब्यात | पुढारी

डोंबिवलीत भररत्यावर स्वयंपाकाच्या गॅस रिफिलिंगचा धंदा; टेम्पो मालक ताब्यात

डोंबिवली ; पुढारी वृत्तसेवा गॅसच्या किंमती वाढल्याने गॅस चोरी, काळ्या बाजाराचे प्रकार वाढू लागले आहेत. डोंबिवलीतील हेदुटणे गावात घरगुती वापराच्या गॅसच्या भरलेल्या टाक्यांची भररत्यावर अदलाबदल करणे. मोठ्या सिलेंडरमधील गॅस छोट्या टाक्यांमध्ये भरून बेकायेशीररित्या गॅस पुरवठा करण्याचे फोटो साेशल मीडियावर व्‍हायरल झाले होते. त्यानंतर खडबडून जाग आलेल्या मानपाडा  पोलिसांनी त्या फोटो मधील टेम्पो मालकाला टेम्पोसह चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, इतर साथीदारांचा शोध सुरू असल्याची माहिती मानपाडा पोलिसांनी दिली.

गेल्या आठवड्याभरात गॅस चोरीच्या दोन ते तीन घटना घडल्या. यासंदर्भात एजन्सी चालकांनी तक्रारी देखील केल्या होत्या. त्यांनतर अचानक एकच सिलेंडरची दोन सिलेंडर करून विक्री करत असल्याचे व्हिडिओ आणि फोटो समोर आले. त्यानुसार मानपाडा पोलिसांनी पाउले उचलत हेदुटने या गावात विट भट्टीच्या पाठीमागील मोकळ्या मैदानात छापा मारला. यावेळी टेम्पो चालकाला टेम्पोसह ताब्यात घेतले. यावेळी महेश नामक व्यक्तीने माझा टेम्पो भाड्याने घेतल्याचे त्यांना सांगण्यात आले. सध्या पोलीस महेश नावाच्या व्यक्तीचा शोध घेत आहेत.

दरम्यान सिलेंडरद्वारे लोकांच्या जीविताशी खेळ सुरु आहेत. एकीकडे महागाईमुळे जनता त्रस्त आहे. तर दुसरीकडे हे लोक व्यवसायासाठी लागणारे आणि घरगुती वापरातील सिलेंडरची रीफीलिंग करून एका सिलेंडरचे दोन टाकी मध्ये (रिफलिंग) करत शहरात अवैधरित्या घरगुती गॅसचा काळा बाजार करुन तो खुलेआम विक्री करत असल्याचे समोर आले आहे.

Back to top button