बंगळूरमध्ये पावसाने हाहाकार! दोघांचा मृत्यू, शहरात पूरसदृशस्थिती (पहा व्हिडिओ)

बंगळूरमध्ये पावसाने हाहाकार! दोघांचा मृत्यू, शहरात पूरसदृशस्थिती (पहा व्हिडिओ)
Published on
Updated on

बंगळूर; पुढारी ऑनलाईन

बंगळूरमध्ये पावसाने हाहाकार घातला आहे. रात्रभर पडलेल्या जोरदार पावसामुळे शहरातील अनेक भागात ३ ते ४ फूट पाणी साठून पूरस्थिती निर्माण झाली आहे. पावसाशी संबंधित घटनांमध्ये २ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू झाला आहे. शहरातील अनेक भागांत पडझड झाली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, बंगळूरमध्ये १२ तासांच्या आत ११४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. यामुळे शहरातील गटारे ओवरफ्लो झाली आहेत.

रस्ते पाण्याखाली गेल्याचे अनेक ठिकाणी दिसून आले. आरआर नगर, कोरमंगला, होस्केरेहल्ली, होरामावू, एचबीआर लेआउट आणि शहराच्या इतर भागांमध्ये पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कर्नाटक स्टेट नॅचरल डिझास्टर मॉनिटरिंग सेंटर (KSNDMC) नुसार, महादेवपुरा मधील होरामावू येथे सर्वाधिक १५५ मिमी पावसाची नोंद झाली. होरामावू येथील अनेक अपार्टमेंटमध्ये पाणी शिरले असून रहिवाशांना टेरेसवर रात्र काढावी लागली.

गजबजलेल्या म्हैसूर रोडवरील नयनदहल्ली जंक्शनचे जलतरण तलावात रूपांतर झाले होते. जंक्शनवर ५ फुटांपेक्षा जास्त पाणी तुंबले आहे. त्याचप्रमाणे बंगळूर International Exhibition Centre जवळ हुनसमारणहल्ली तलाव ओव्हरफ्लो झाला. यामुळे यशवंतपूरपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती. शिवाजीनगर हद्दीत १२ फूट काँक्रीटची भिंत कोसळून १५ हून अधिक वाहनांचे नुकसान झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news