Lok Sabha Election 2024 | ठाणे शिंदेंच्या शिवसेनेचेच! नरेश म्हस्के यांना उमेदवारी, कल्याणमधून श्रीकांत शिंदे रिंगणात | पुढारी

Lok Sabha Election 2024 | ठाणे शिंदेंच्या शिवसेनेचेच! नरेश म्हस्के यांना उमेदवारी, कल्याणमधून श्रीकांत शिंदे रिंगणात

पुढारी ऑनलाईन डेस्क : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेने बुधवारी (दि.१ मे) कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा केली. कल्याण लोकसभा मतदारसंघातून (Kalyan Lok sabha 2024) श्रीकांत एकनाथ शिंदे आणि ठाणे लोकसभा मतदारसंघातून (Thane Lok sabha 2024) नरेश म्हस्के यांचे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार म्हणून नाव घोषित करण्यात आले. ठाण्याच्या जागेवरून गेल्या काही दिवसांपासून तिढा निर्माण झाला होता. पण ठाण्याच्या जागा अखेर शिंदेंच्या शिवसेनेकडेच राहिली आहे.

ठाणे लोकसभेची जागा शिवसेनेकडे जाणार की, या जागेवर भाजप आपला दावा कायम ठेवणार? यावरून सस्पेन्स वाढला होता.  ठाण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून माजी महापौर नरेश म्हस्के यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. या जागेसाठी आमदार प्रताप सरनाईक यांचेही नाव चर्चेत होते. तर दुसरीकडे या मतदारसंघासाठी भाजपही आशादायी होता. भाजपकडून इच्छुक असलेल्या माजी खासदार डॉ. संजीव नाईक यांनीदेखील त्यांचा प्रचार सुरू ठेवला असल्याने ठाणे लोकसभा मतदारसंघाचा सस्पेन्स वाढला होता.

ठाणे लोकसभेची जागा आता शिंदेंच्या शिवसेनेला गेली आहे. विशेष म्हणजे भाजपने या जागेसाठी प्रयत्न केले. त्यामुळेच भाजपकडून भेटीगाठी आणि छोट्या छोट्या बैठकांचे सत्र सुरूच ठेवण्यात आले होते. ऐनवेळी हा मतदार संघ जर भाजपच्या वाट्याला आलाच तर प्रचाराला दिवस कमी पडू नयेत यासाठी भाजपकडून रणनिती आखण्यात आली होती. तर दुसरीकडे राजन विचारे यांच्यासमोर शिंदेंच्या शिवसेनेकडून अनेक नवे चर्चेत होती. पण भाजपकडून पसंतीची मोहर उमटत नसल्याने या मतदार संघांचा तिढा वाढला होता.

या जागेसाठी माजी महापौर आणि शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांचेच नाव आघाडीवर होते. त्यानंतर प्रताप सरनाईक यांच्याही नावाची चर्चा सुरु होती. मात्र, म्हस्के यांच्या नावाला ग्रीन सिग्नल मिळाल्याने ठाण्याच्या जागेचा तिढा सुटला आहे.

हे ही वाचा :

Back to top button