अंतराळ प्रवासासाठी येतो तरी किती खर्च? | पुढारी

अंतराळ प्रवासासाठी येतो तरी किती खर्च?

वॉशिंग्टन : जगात असे फारच कमी लोक असतील की, त्यांना फिरावयास आवडत नाही. मात्र, प्रत्येकाला आपण शक्य तितके जास्त फिरावे असेच वाटत असते. जितके बजेट आहे, तेवढ्यात हे लोक फिरण्याचा मनसोक्‍त आनंद लुटत असतात. पर्यटनाच्या माध्यमातून विदेशी सहलीवर जाणार्‍यांची संख्याही मोठी असते. याबरोबरच लोकांनी आता अंतराळ प्रवासावरही जाण्यास सुरुवात केली आहे. मग प्रश्‍न पडतो, अंतराळ प्रवासावर जायचे असेल तर नेमका खर्च तरी किती येतो.

सध्या लोकांना अंतराळ पर्यटनावर नेण्याचा विचार सुरू आहे. काही लोक तर नुकतेच अंतराळ प्रवासावरून परतलेही आहेत. यामुळे अंतराळ प्रवासावर जाण्यास उत्सुक असलेल्या लोकांची यादी मोठी होऊ लागली आहे. रिचर्ड ब्रेन्सन, जेफ बेजोस, अ‍ॅलन मस्क यांच्यासारखे अब्जाधीश लोक पर्यटकांना अंतराळ प्रवासावर नेण्याची तयारी करत आहेत. रिचर्ड ब्रेन्सन यांच्या कंपनीने तर अंतराळ प्रवासासाठी बुकिंग करण्याच्या कामासही सुरुवात केली आहे. मग अंतराळ प्रवासाचे नेमके किती बजेट असेल.
अंतराळात जायचे असेल तर 4.5 लाख डॉलर म्हणजे 3 कोटी 43 लाख रुपये इतकी मोठी रक्‍कम भरावी लागते. मात्र, हे तिकीट त्यांनाच मिळते ज्यांनी दीड लाख डॉलर भरून बुकिंग केलेले आहे. मात्र, अशा बुकिंगला अद्याप सुरुवात करण्यात आलेली नाही. एक हजार लोकांचे बुकिंग झाले की अंतराळ पर्यटनाला सुरुवात होणार आहे. स्पेस एक्सने आपल्या फ्लाईटने चार लोकांना तीन दिवसांसाठी अंतराळात पाठविले होते.

Back to top button