‘इथे’ लग्नात बोलावले जातात भाडोत्री पाहुणे!

‘इथे’ लग्नात बोलावले जातात भाडोत्री पाहुणे!
Published on
Updated on

सेऊल : हल्ली भाड्याने बॉयफ्रेंड किंवा काही वेळ साथसोबत देणारे सोबतीही मिळतात. विशेषतः परदेशात हे प्रकार अनेक पाहायला मिळतात. लग्नाबाबतही भाड्याची माणसं मिळत असतील याची मात्र आपण कल्पना करणार नाही. लग्न सोहळ्याला कुटुंबासह नातेवाईक, मित्रपरिवार असा खूप मोठा गोतावळा असतो. भारतात तर कुटुंबातील एवढं मंडळी असतात की, कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही हा प्रश्न असतो. लग्नातील एकाच बाजूचे पाहुणे अनेक वेळा हजारावर असतात, मग अशावेळी पाहुण्यांचा यादीला कात्री लावावी लागते. गेल्या काही वर्षांमध्ये भव्य आणि ग्रँड सोहळा हे सोशल मीडिया ट्रेंड बनला आहे, पण या जगाचा पाठीवर एक असा देश आहे जिथे लग्नासाठी पाहुणेही पैसे देऊन बोलावले जातात. त्यामागील कारण जाणून तर तुम्ही अवाक् व्हाल.

आम्ही बोलत आहोत दक्षिण कोरियातील लग्नांबद्दल. इथे लग्नात मोठ्या संख्येने पाहुणे बोलावण्यासाठी पैसे दिले जातात. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, इथे अनेक लग्नात पाहुणे देण्यासाठी एजन्सीज वेडिंग गेस्टस्चा बिजनेस करतात. या एजन्सीज लग्नात पैसे घेऊन तुम्हाला हवे तेवढे पाहुणे उपलब्ध करून देतात; मात्र कोरोना काळात या कंपनींवर गदा आली होती. आता या कंपन्या पुन्हा जोर धरत आहेत. 'हॅगेक फ्रेंडस्' या सारख्या अनेक कंपन्या वधू किंवा वराच्या कुटुंबाचे जवळचे नातेवाईक म्हणून माणसं पुरवतात. ही माणसं लग्नात दिलेली पाहुण्यांची भूमिकाही उत्तम पार पाडतात. ही पाहुणे मंडळी अगदी ट्रेंड असतात व लग्नाच्या समारंभात त्यांचा वावर पाहून तर कोणीही म्हणणार नाही ही भाड्यांनी आणलेली माणसे आहेत! दक्षिण कोरियात पूर्वी 99 हून अधिक पाहुणे हे लग्नात उपस्थित राहू शकायचे. आता ही संख्या 250 एवढी करण्यात आली आहे. एजन्सीजनं सांगितले, जसं जसे निर्बंध शिथिल होत गेले त्यांना भरपूर कॉल यायला लागले आहेत. आता लोकांना मोठ्या संख्येने पाहुणे लग्नाला हवे असतात. भाड्याने पाहुणे पाठवण्यासाठी एका व्यक्तीचे भाडेही ठरविण्यात आले आहे. एक पाहुणा 1500 पेक्षा जास्त पैसे घेत असतो. लग्नात पैसे देऊन पाहुणे बोलावण्यामागील तेवढेच महत्त्वाचे आहे. दक्षिण कोरियामध्ये लग्नात जितके जास्त पाहुणे तितके तुमचे सोशल सर्कलही मोठे असे मानले जाते. म्हणून या देशात पैसे देऊन मोठ्या संख्येने लग्नासाठी पाहुणे बोलावली जातात, मग ती मंडळी वधूकडून असतात तर वराकडूनही असतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news