नाशिक : सातपूर दरोड्यातील संशयिताचे रेखाचित्र पोलिसांकडून जारी | पुढारी

नाशिक : सातपूर दरोड्यातील संशयिताचे रेखाचित्र पोलिसांकडून जारी

नाशिक (सातपूर) : पुढारी वृत्तसेवा
सातपूर येथील उद्योजक बाबुशेठ नागरगोजे यांच्या घरावर चार ते पाच जणांच्या टोळीने दिवसाढवळ्या दरोडा टाकल्याची घटना सोमवारी (दि.7) घडली. या दरोड्यातील संशयितांपैकी एकाचे रेखाचित्र पोलिसांनी सोशल मीडियावर व्हायरल केले आहे.

सोमवारी सकाळी 11 वाजेच्या सुमारास लाव्होटी मळा, जाधव संकुल येथे पाच जणांच्या टोळीने घरातील महिलांना चाकूचा धाक दाखवत जबरी लूट केली. या घटनेतील संशयित दोन लाखांची रोकड व सुमारे 40 ते 50 तोळे सोने घेऊन पसार झाले आहेत. या संशयिताच्या मागावर पोलिस उपआयुक्त विजय खरात यांच्या मार्गदर्शनाखाली सातपूर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेंद्र चव्हाण यांनी विविध पथके तयार केली आहेत. दरम्यान, या घटनेतील साक्षीदार आरती नागरगोजे यांनी केलेल्या वर्णनानुसार दरोड्यातील संशयिताचे रेखाचित्र तयार करण्यात आले आहे. सातपूर पोलिसांनी हे रेखाचित्र सोशल मीडियावर व्हायरल करून या संशयिताची माहिती मिळाल्यास सातपूर पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा :

Back to top button