सोलापूर : वृद्धेवर बलात्कार करून खून; आरोपीला जन्मठेप | पुढारी

सोलापूर : वृद्धेवर बलात्कार करून खून; आरोपीला जन्मठेप

 सोलापूर : पुढारी वृत्तसेवा
डुलचे (शासकीय मदत योजनेचा निधी) दीड हजार रुपये हिसकावून घेण्यास विरोध केल्याने वृद्धेवर (वय 75) बलात्कार करून खून करण्यात आला होता. गेल्या जानेवारी 2019 मध्ये आरोपी मल्लप्पा बसवंत बनसोडे (वय 48 रा. उडगी ता. इंडी जि. विजापूर) याने कडबगांवचे शिवरात लिंबाच्या झाडाखाली हा प्रकार केला होता.

याप्रकरणी त्याला क्रूरपणे खुनाबद्दल जन्मठेप व 10 हजार रुपये दंड तसेच बलात्काराबद्दल 15 वर्षे सक्‍तमजुरी व 10 हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली. अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश यू. एल. जोशी यांनी हा निकाल दिला.

Back to top button