आपलं आजचं राशिभविष्य : उत्साहवर्धक वातावरण राहील. धार्मिकता वाढेल | पुढारी

आपलं आजचं राशिभविष्य : उत्साहवर्धक वातावरण राहील. धार्मिकता वाढेल

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

मेष : वस्तू गहाळ होण्याची शक्यता. कर्ज वाढेल. काटकसर महत्त्वाची. मनाविरुद्ध घटना घडतील. व्यावहारिक सतर्कता महत्त्वाची आहे.
राशिभविष्य
वृषभ

वृषभ : उत्साहवर्धक वातावरण राहील. धार्मिकता वाढेल. मित्रमंडळींचा सहवास आनंददायी होईल. प्रलंबित कामांत प्रगती होईल.
राशिभविष्य
मिथुन

मिथुन : आजचे काम उद्या करू, या वृत्तीमुळे आर्थिक व मानसिक ताण निर्माण होऊ शकतो. नियोजनाअभावी कामे रखडतील. आळस सोडा.
राशिभविष्य
कर्क

कर्क : प्रेम प्रकरणात यश मिळेल. वैवाहिक सौख्य उत्तम राहील. आर्थिक प्रश्न सुटतील. आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. अतिथ्यामध्ये दिवस जाईल.
राशिभविष्य
सिंह

सिंह : मनासारख्या घटना घडतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. अधिकारांत वाढ होईल. वाडवडिलांची पुण्याई उपयोगी पडेल.
राशिभविष्य
कन्या

कन्या : सरकारी कामांत अडचणी. छातीशी संबंधित आजार उद्भवतील. आरोग्याकडे लक्ष देणे आवश्यक. नियमांचे पालन आवश्यक आहे.
राशिभविष्य
तुळ

तूळ : श्वसनासंबंधित विकार उद्भवतील. अस्वस्थता राहील. प्राणायाम व योग साधनेची गरज. वादविवादापासून दूर राहा. मनाविरुद्ध घटना घडतील.
राशिभविष्य
वृश्चिक

वृश्चिक : प्रवासातील सुखद अनुभव येतील. मान-सन्मान मिळवून देणारी घटना घडेल. कोर्ट-कचेरीच्या कामांत यश मिळेल. प्रवासाचे योग.
राशिभविष्य
धनु

धनु : सत्संगामध्ये दिवस जाईल. आरोग्य उत्तम राहील. आर्थिकद़ृष्ट्या लाभदायक दिवस. शत्रू पीडा कमी होईल. पदोन्नतीचे योग.
राशिभविष्य
मकर

मकर : खरेदीचा मोह नुकसान करणारा ठरेल. देणीदारांकडून त्रास होईल. सामंजस्याने प्रश्न सोडवावे लागतील. कौटुंबिक कलह टाळावा. संयमाने वागा.
राशिभविष्य
कुंभ

कुंभ : चुकीच्या निर्णयामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. गुंतवणूक करण्यास अयोग्य दिवस. संयम आवश्यक आहे. प्रवासात सावधानता बाळगा.
राशिभविष्य
मीन

मीन : कर्तव्यदक्ष स्वभावामुळे कौतुक होईल. आवडत्या व्यक्तींबरोबर संवाद होतील. पदोन्नतीचा योग आहे. आर्थिक परिस्थिती सुधारेल.

राशिभविष्य

Back to top button