बेळगाव : जनावरांच्या बाजारात पावणेदोन कोटींची उलाढाल : पंढरपुरी, गवळट, गुजर जातीच्या जनावरांना मागणी | पुढारी

बेळगाव : जनावरांच्या बाजारात पावणेदोन कोटींची उलाढाल : पंढरपुरी, गवळट, गुजर जातीच्या जनावरांना मागणी

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा
दर शनिवारी एपीएमसीमध्ये जनावरांचा बाजार भरतो. या बाजारात दुभत्या जनावरांसह बैलजोड्यांची विक्री केली जाते. शनिवारी सुमारे 500 जनावरे विक्रीसाठी आणण्यात आली होती. त्यापैकी 300 जनावरांची विक्री झाली असून सुमारे 1 कोटी 80 लाखांची उलाढाल जनावरांच्या बाजारात झाली असल्याची माहिती जनावरांचे व्यापारी व शेतकर्‍यांनी दै. ‘पुढारी’ला दिली.

शेतकर्‍यांच्या घरात गाय,बैल, म्हैस अशी जनावरे दावणीला असतात. अनेक शेतकरी हौसेपोटी जनावरे बाळगतात तर काही शेतकरी जोडव्यवसाय म्हणून जनावरे बाळगतात. जनावरांच्या किमतीही अधिक आहेत. त्यामुळे जनावरांच्या बाजारात मोठी उलाढाल होत असते. जनावरांचे व्यापारी जातीवंत जनावरे खरेदीसाठी गर्दी करतात.

पंढरपुरी, गुजर व गवळट जातींच्या म्हशींना अधिक मागणी आहे. 60 हजारपासून 1 लाख 20 हजारपर्यंत दुभत्या म्हशींच्या किमती आहेत. बैलजोडीच्या किमती 50 हजारपासून 80 हजारपर्यंत आहेत. सध्या शेतीमध्ये यंत्रांचा वापर वाढल आहे. त्यामुळे जनावरांना मागणी कमी आहे. मोजकेच शेतकरी बैलांचा वापर करून शेती करतात. काहीजण हौसेपोटी शर्यतीसाठी बैलजोडी पाळतात. जनावरांचा खर्चही अधिक असल्याने याकडे शेतकर्‍यांचा कल कमी दिसत आहे. गाय, म्हशी अशी दुभती जनावरे पाळण्याकडे कल वाढला आहे. दुग्ध व्यवसायातून अनेक आपल्या आर्थिक गरजा भागवत असल्याने या जनावरांची खरेदी वाढली आहे.

हे ऐका :

चला ऐकुया महागाईवरचा दैनिक पुढारीचा महागाई विषयावरचा पॉडकास्ट

हेही वाचलत का ?

 

 

Back to top button