देवळाली कॅम्प : लष्करी जवानाचा रनिंग करताना पडल्याने मृत्यू | पुढारी

देवळाली कॅम्प : लष्करी जवानाचा रनिंग करताना पडल्याने मृत्यू

देवळाली कॅम्प : पुढारी वृत्तसेवा : येथील लष्करी हद्दीत नियमित रनिंग करीत असताना पडल्याने जवानाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

हिमांशू शेखर जाना (37) असे मृत जवानाचे नाव असून, जाना हे लष्करात हवालदार पदावर कार्यरत होते. शनिवारी (दि.19) सकाळी ते लष्करी हद्दीत पळण्याचा नियमित सराव करीत असताना ही घटना घडली. पळत असताना अचानक पडल्याने त्यांना औषधोपचारासाठी मिलिटरी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी मेजर डॉ. विकास कुमार यांनी दिलेल्या खबरीवरून पोलिस दप्तरी नोंद करण्यात आली असून, तपास हवालदार ठाकरे करीत आहेत.

Back to top button