Kolhapur Rain: रत्नागिरीकडे जाणारी बस पंचगंगेच्या पुरात अडकली | पुढारी

Kolhapur Rain: रत्नागिरीकडे जाणारी बस पंचगंगेच्या पुरात अडकली

कोल्हापूर, पुढारी ऑनलाईन :गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे(Kolhapur Rain) पन्हाळा रोड खचला आहे. तसेच पाऊस वाढतच असल्याने (Kolhapur Rain) आलेल्या पुरात कोल्हापुराहून रत्नागिरीकडे जाणारी कर्नाटकची बस रजपूतवाडीजवळ चार फूट पाण्यात अडकली.

आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांनी मध्यरात्री या बसमधील २५ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.

अधिक वाचा:

बुधवारपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे पंचगंगेसह जिल्ह्यातील सर्व नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. अनेक ठिकाणचे मार्ग बंद झाले असून पंचगंगेची पातणीपातळी सध्या ४६. ७ फुटांवरून वाहत आहे.

२०१९ च्या महापुरावेळी पन्हाळा, जोतिबा आणि जिल्ह्यातील अन्य रस्ते खचले होते. गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ होत आहे. पंचगंगेच्या पाणीपातळीत वेगाने वाढ झाल्याने रेडेडोह फुटला आहे.

अधिक वाचा

पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून ४६. ७ फुटांवरून वाहत आहेत. ही पाणीपातळी धोकापातळीपेक्षा दोन फुटांनी जास्त आहे.

रेडेडोह फुटल्याने कोल्हापूर- रत्नागिरी महामार्गावर पाणी आले आहे. तरीही मध्यरात्री दोन वाजता कोल्हापूरहून रत्नागिरीकडे जाणारी कर्नाटकची बस रजपूतवाडीजवळ जवळपास तीन फूट पाण्यात अडकली.

अधिक वाचा 

पाण्याचा वेग प्रचंड असल्याने बस पुढे जात नव्हती. पाण्याचा अंदाज न आल्याने चालकाने बस पुढे नेण्याचा प्रयत्न केला.

बस अडकल्याची माहिती मिळताच जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी बसमधील आठ महिला, आठ पुरुषांसह चालक आणि वाहकांची सुटका केली.

बसमध्ये पाणी शिरल्याने प्रवासी प्रचंड घाबरले होते. आपत्ती व्यवस्थापनाची पथके घटनास्थळी पोहोचल्यानंतर दोन जवानांनी बसपर्यंत पोहोचत प्रवाशांना धीर दिला. त्यानंतर बोटींमधील प्रवाशांना बाहेर काढले.

पन्हाळा रोड खचला

दोन दिवसांच्या जोरदार पावसामुळे पन्हाळ्याजवळील रस्ता खचला आहे. त्यामुळे गडावर जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. २०१९ च्या पावसाळ्यात हा रस्ता पूर्ण खचला होता. त्यामुळे गडावर जाणारे सर्व रस्ते बंद झाले होते.

अधिक वाचा 

पाहा फोटोज :

[visual_portfolio id=”11817″]

Back to top button