New Year Celebration : अंतराळवीरांचे ‘आयएसएस’मध्ये सोळावेळा न्यू इयर सेलिब्रेशन | पुढारी

New Year Celebration : अंतराळवीरांचे 'आयएसएस'मध्ये सोळावेळा न्यू इयर सेलिब्रेशन

वॉशिंग्टन :  पृथ्वीच्या खालील कक्षेत भ्रमण करत असलेल्या आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात राहून अनेक अंतराळवीर वेगवेगळे वैज्ञानिक प्रयोग करत असतात. तेथील अनेक प्रकारची रंजक माहिती वेळोवेळी समोर येत असते. या स्थानकावर राहून हे अंतराळवीर एक-दोन वेळा नव्हे तर सोळा वेळा नव्या वर्षाचे आगमन अनुभवत असतात. ( New Year Celebration)

रॅपिड व्हेलॉसिटी म्हणजेच कमालीचा वेग आणि पृथ्वीच्या भोवती प्रदक्षिणा घालत असल्याने तेथील अंतराळवीरांना चोवीस तासांच्या चक्रामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या सोळा घटना पाहता येतात. याबाबत ‘नासा’ने म्हटले आहे की चोवीस तासांमध्ये स्पेस स्टेशन पृथ्वीभोवती 16 वेळा प्रदक्षिणा घालते. या काळात तेथील अंतराळवीरांना सोळा सूर्योदय आणि सूर्यास्त पाहायला मिळतात. ताशी 28 हजार किलोमीटर वेगाने हे स्पेस स्टेशन प्रत्येक 90 मिनिटांनी पृथ्वीची एक प्रदक्षिणा पूर्ण करते. त्यामुळे अंतराळवीरांना सोळा वेळा नव्या वर्षाचे स्वागत करता येते.

आपल्या या प्रवासात ते वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या क्षेत्रांवरून जात असल्याने हे शक्य होते. स्पेस स्टेशनवरील अंतराळवीरांना रोज पृथ्वीच्या विविध भागातील दिवस व रात्र पाहायला मिळतात. अंतराळवीर स्वतः 45 मिनिटांचा दिवस व 45 मिनिटांच्या रात्रीत राहतात व हे चक्र दिवसातून सोळा वेळा चालत असते. त्यामुळे अंतराळवीरांना तिथे मायक्रोबायोलॉजी आणि धातुविज्ञानासारख्या अनेक क्षेत्रातील प्रयोग करण्याची संधी मिळते. जी माहिती पृथ्वीवरून राहून मिळवता येत नाही ती अशा प्रकारे अंतराळ स्थानकात राहून मिळवता येते. एका सुसंगत कार्यक्रमासाठी ग्रीनविच मीन टाईमचे तिथे पालन केले जात असते. मात्र वारंवार दिवस व रात्र पाहत असल्याने सर्कैडियन लय कायम ठेवणे हे आव्हानात्मक असते. ( New Year Celebration)

Back to top button