इमारतवजा शहरात राहतात फक्त 272 लोक! | पुढारी

इमारतवजा शहरात राहतात फक्त 272 लोक!

अलास्का : जगभरात लोकसंख्या आटोक्यात राहणे अवघड होत चालले आहे. वेगाने वाढणारी लोकसंख्या रोखण्यासाठी अनेक देशांत विविध प्रयत्न कित्येक दशकांपासून केले जात आहेत. एकीकडे, चीनने एकेरी अपत्याचे धोरण राबवले, दुसरीकडे अन्य देशांनी वेगवेगळे प्रयत्न करून पाहिले आहेत. या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर एका महिलेने आपल्या शहरातील वस्तुस्थिती सांगत सर्वांनाच हैराण करून टाकले आहे.

अलास्कास्थित व्हिटियर शहरात केवळ दोनशे ते अडीचशे लोक राहतात. सर्वात हैराण करणारी बाब ही आहे की, हे सर्व लोक शहरातील एकाच इमारतीत राहतात. आता एरव्ही, शहरांत-गावागावांत छोटी घरे असतात, काही उत्तुंग इमारती असतात; पण येथे मात्र 200 ते 250 लोक केवळ एकाच इमारतीत राहतात. 14 मजली या इमारतीला बेगीच टॉवर या नावाने ओळखले जाते. या इमारतीत पूर्वी लष्करी दलाचे कार्यालय होते. नंतर त्याला हॉटेलचे स्वरूप देण्यात आले आणि आता तर सारे शहरच या इमारतीत वसले आहे.
या इमारतीचे ठळक वैशिष्ट्य म्हणजे, या इमारतीच्या आतच जे काही हवेे, ते सारे काही मिळते. त्यासाठी बाहेर कुठेही जावे लागत नाही. इमारतीच्या दर्शनी भागात पोस्ट ऑफिस आहे आणि हॉलच्या उजव्या बाजूला पोलिस ठाणेदेखील आहे. या इमारतीत गेल्यानंतर एखाद्या शाळेत गेल्यासारखे वाटेल; पण फरक इतकाच आहे की, यात केवळ एकच कुटुंब राहते. आता आणखी आश्चर्य म्हणजे शाळा, हॉस्पिटल या सार्‍या सुविधादेखील इमारतीच्या आतच उपलब्ध आहेत.

साहजिकच, एक प्रश्न निर्माण होईल की, इतके सारे या एकाच इमारतीत का? याचे कारण असे की, अलास्कामध्ये प्रचंड थंडी पडते आणि यामुळे घरातून बाहेर पडणेदेखील अवघड असते. या थंडीपासून बचावासाठीच सार्‍या चीज वस्तू या इमारतीच्या आतच उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, जेणेकरून बाहेर जावे लागणार नाही. सध्या या शहरवजा इमारतीत 272 लोक राहतात आणि ही इमारत हेच त्यांचे जग बनले आहे.

Back to top button