बडीशेपचे ’हे’ आहेत आरोग्यासाठीचे लाभ…

बडीशेपचे ’हे’ आहेत आरोग्यासाठीचे लाभ…

नवी दिल्ली : बडीशेप हा पदार्थ आपण मुखशुद्धीसाठी वापरतो. जेवणानंतर बडीशेप खाण्यास सगळेच पसंती देतात. मात्र केवळ मुखशुद्धीसाठीच नव्हे तर आरोग्यासाठीही बडीशेपचे अनेक लाभ आहेत, असे आहारतज्ज्ञ सांगतात. बडीशेपमध्ये कॅल्शिअम, सोडिअम, फॉस्फरस, आर्यन आणि पोटॅशिअमसारखे शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक आढळतात.

पोटाच्या तक्रारी वारंवार जाणवत असतील तर बडीशेप सेवन करणे फायदेशीर ठरते. बडीशेपमुळे अ‍ॅसिडिटी आणि अपचनाचा त्रास होत नाही. बडीशेपचा गुणधर्म हा थंड असल्याने उन्हाळ्यात उष्णतेचा त्रास होत असेल तर बडीशेप खाणं आरोग्यदायी ठरतं. बडीशेपमध्ये पोटॅशियमची मात्रा मुबलक असते. त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहण्यास मदत होते. दमा, अस्थमा यासारख्या आजारावर बडीशेप गुणकारी मानली जाते. बडीशेपमध्ये फायटोन्यूट्रिएंटस् घटक असतो. त्यामुळे जर तुम्हाला सायनसचा त्रास होत असेल तर बडीशेपचे सेवन करणं रामबाण उपाय आहे.

पोटॅशियम, सेलेनियम आणि जस्त यांसारखे घटक त्वचेच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. बडीशेपचे सेवन केल्याने रक्तातील ऑक्सिजन वाढण्यास मदत होते. तसंच हार्मोन्स संतुलन राखण्यासाठी बडीशेपचं सेवन गुणकारी मानलं जातं. बडीशेपच्या सेवनाने व्हिटॅमिन 'ए'ची कमतरता दूर होते. त्यामुळे डोळ्यांच्या आरोग्यासाठी आहारात बडीशेपचा समावेश नक्की करणं फायदेशीर ठरतं. वजन कमी करण्यासाठी बडीशेप फायदेशीर ठरतं. सकाळी उपाशीपोटी बडीशेपची पूड कोमट पाण्यातून घेतल्याने जास्त वेळ पोट भरलेलं राहतं. बडीशेप थंड असण्याबरोबरच त्यातील फायबरमुळे सतत भूक लागत नाही. त्यामुळे वजन कमी करण्यास बडीशेप फायदेशीर ठरतं.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news