आईस्क्रीम खाताना ‘हे’ सुद्धा लक्षात असावे… | पुढारी

आईस्क्रीम खाताना ‘हे’ सुद्धा लक्षात असावे...

नवी दिल्ली : आईस्क्रीम खाणे आवडत नाही असे म्हणणारा माणूस विरळच. तशातही अंगाची लाही लाही करणारा कडक उन्हाळा असेल तर आईस्क्रीम हटकून खाल्ले जातेच. गारवा देणारे आणि जिभेलाही तृप्त करणारे आईस्क्रीम खाणे ही अनेकांची सवयच बनलेली असते. मात्र, ‘अति सर्वत्र वर्जयेत’ हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. आईस्क्रीममुळेही आरोग्यावर दुष्परिणाम होऊ शकतात याचे भान ठेवावे लागते. अशाच काही दुष्परिणामांची ही माहिती…

आईस्क्रीममध्ये 1000 कॅलरीज असतात ज्याने वजन वाढू शकते. त्यामुळे लठ्ठपणा टाळण्याचा किंवा वजन घटवण्याचा प्रयत्न करणार्‍यांनी याबाबत सावधच असलेले चांगले. अधिक आईस्क्रीम खाल्ल्याने ब्लड प्रेशर म्हणजेच रक्तदाब प्रभावित होऊ शकतो. त्यामुळे अर्थातच हृदयाचे आरोग्य बिघडू शकते.

अधिक आईस्क्रीम खाल्ल्याने मेंदूच्या नसा प्रभावित होऊ शकतात. आईस्क्रीम पचनाशी संबंधी समस्या वाढू शकतात. आईस्क्रीमचे पचन होण्यात अधिक वेळ लागतो ज्याने ब्लोटिंगची समस्या निर्माण होऊ शकते. आईस्क्रीम आणि त्यामधील घटक हिरड्या कमकुवत करू शकतात. आईस्क्रीमचे सेवन केल्याने शरीर सुस्त होते. आईस्क्रीमच्या अतिसेवनाचे दुष्परिणाम अनेक असल्याने याबाबत काळजी घेणे गरजेचे ठरते.

Back to top button