स्कॉटलंडमध्ये सापडले प्राचीन किल्ल्याचे अवशेष | पुढारी

स्कॉटलंडमध्ये सापडले प्राचीन किल्ल्याचे अवशेष

लंडन : पुरातत्त्व संशोधकांनी स्कॉटलंडमध्ये इसवी सनाच्या दुसर्‍या शतकातील रोमन किल्ल्याचे अवशेष शोधून काढले आहेत. हे अवशेष तसेच प्राचीन अँटोनाईन भिंतीचेही अवशेष सापडले आहेत. याठिकाणी संशोधकांना किल्ल्याच्या पायाचे अवशेष दिसून आले. बि

ब्रिटनमध्ये रोमन साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती. अँटोनाईन वॉलजवळ त्या काळात सुरक्षेसाठी अशा 41 वास्तू बांधण्यात आलेल्या होत्या. त्या बहुतांशी माती आणि लाकडाच्या बनलेल्या होत्या. स्कॉटलंडमध्ये 65 किलोमीटरच्या भागात अशा गढ्या, चौक्या होत्या.‍

इसवी सन 142 मध्ये रोमन सम्राट अँटोनियस पायस याने ही भिंत बांधण्याचा आदेश दिला होता. त्याच्या आधीचा सम्राट हार्डियनने तत्पूर्वी वीस वर्षांच्या आधी ‘हार्डियन्स वॉल’ नावाची भिंत बांधली होती. ती दक्षिणेत 160 किलोमीटरवर आहे. त्यापेक्षा आपण काही तरी सरस करावे अशी अँटोनियसची महत्त्वाकांक्षा होती. मात्र, त्याचा हा प्रयत्न यशस्वी होऊ शकला नाही. सध्या या भिंत व किल्ल्यांच्या ठिकाणी केवळ पायाचे अवशेषच शिल्लक राहिलेले आहेत.

Back to top button