उत्तर भारतासह मध्य महाराष्ट्राला ३० मेपर्यंत उष्णतेचा रेड अलर्ट | पुढारी

उत्तर भारतासह मध्य महाराष्ट्राला ३० मेपर्यंत उष्णतेचा रेड अलर्ट

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : उत्तर भारतासह विदर्भ-मध्य महाराष्ट्राला ३० मे पर्यंत भारतीय हवामान खात्याने उष्णतेचा रेड अलर्ट रविवारी जारी केला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, उत्तर भारतातील दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमध्ये ३० मे पर्यंत तीव्र उष्णता राहील.

हवामान खात्याकडून कोणत्या भागात  रेड अलर्ट जारी?

  • उत्तर भारतासह विदर्भ-मध्य महाराष्ट्राला ३० मे पर्यंत रेड अलर्ट
  • दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमध्ये ३० मे पर्यंत तीव्र उष्णता
  • महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, या भागामध्ये उष्णतेचा रेड अलर्ट
  • छत्तीसगड आणि गुजरातला ही उष्णतेच्या लाटेचा फटका
मे महिन्यामध्ये उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत आहे. तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. आता हवामान विभागाने, राजस्थान -दिल्लीसह उत्तर भारतातील राज्यांना ३० मे पर्यंत उष्णतेच्या लाटेचा रेड अलर्ट जारी केला. उत्तर भारतातील या राज्यांसह महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र, या भागामध्ये उष्णतेचा रेड अलर्ट असेल. छत्तीसगड आणि गुजरातला ही उष्णतेच्या लाटेचा फटका बसणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

 राजस्थानमध्ये उन्हाचा पारा ५० अंशावर

राजस्थानच्या फलौदीमध्ये २५ मे (शनिवारी) तापमान उच्चांक पातळी गाठत ५० अंश सेल्सिअस वर पोहचले. तर जैसलमेरमध्ये ४८.९ अंश सेल्सिअस, बिकानेरमध्ये ४७.२ अंश सेल्सिअस, चुरुमध्ये ४७ अंश सेल्सिअस अशी तापमानाची नोंद झाली. असाच उन्हाचा पारा राजस्थानमध्ये येत्या ३० मे पर्यंत असण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली.
राजधानी दिल्लीतील नजफगडमध्ये ४६. ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद २५ मे रोजी झाली. यामुळे राजधानीतील पर्यटनाच्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी कमी झाली आहे.
दुसरीकडे, ईशान्येतील आसाम, मेघालय, अरुणाचल प्रदेश, नागालँड या राज्यांमध्ये येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये अति मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर पश्चिम बंगाल मध्येही चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस होऊ शकतो असाही अंदाज हवामान खात्याने दर्शविला.
हेही वाचा 

Back to top button