ब्रह्मांड आहे 13.8 अब्ज वर्षांचे | पुढारी

ब्रह्मांड आहे 13.8 अब्ज वर्षांचे

कॅलिफोर्निया : ब्रह्मांडाच्या वयाचा अंदाज घेण्यासाठी शास्त्रज्ञ नेहमीच कॉस्मिक मायक्रोवेव्हची मदत घेत असतात. या तंत्रज्ञानाच्या मदतीने काढण्यात आलेल्या नकाशाद्वारे सर्वात दूरच्या प्रकाशाचे अंतर मोजून शास्त्रज्ञ ब्रह्मांडाचे वय निश्चित करण्याचा प्रयत्न करतात.

2020 मध्ये या तंत्रज्ञानाचा वापर करून शास्त्रज्ञांनी ब्रह्मांडाचे वय सुमारे 13.8 अब्ज वर्षे असल्याचे स्पष्ट केले. पण हा आकडा कसा निश्चित करण्यात आला? कारण आजपर्यंत आपण संपूर्ण विश्वाचे निरीक्षण करू शकलो नाही आणि त्याचा किती भाग आपण जाणून घेऊ शकलो, हे देखील आपल्याला माहीत नाही.

ब्रह्मांडाबद्दल बोलायचे झाल्यास येथील तारे, आकाशगंगा आणि इतर अनेक खगोलिय पिंडाचे वय अब्जावधी वर्षे असू शकते. दीर्घ अंतरावरून येणारा प्रकाश आणि अन्य प्रकारच्या विश्लेषणावरून ब्रह्मांडाच्या वयाचा अंदाज लावता येतो, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. पण हे देखील खरे आहे की, शास्त्रज्ञांचे ब्रह्मांडाच्या वयावर कधीच एकमत झाले नाही. मात्र त्यांचे निष्कर्ष नक्कीच चांगले होत बनत आहेत.

ब्रह्मांडाच्या वयाची गणना एका प्रक्रियेअंतर्गत निश्चित करण्यात आली आहे. एडविन हबल नावाच्या खगोल शास्त्रज्ञाने शंभर वर्षांपूर्वी 1920 मध्ये याची सुरुवात केली, जेव्हा त्याने एखाद्या वस्तूचे अंतर शोधण्याचा मार्ग शोधून काढला ज्यावरून प्रकाश पृथ्वीवर किती वेळात पोहोचतो, याचा अभ्यास करण्यात आला.

Back to top button