पियानो वाजवणारा पोपट! | पुढारी

पियानो वाजवणारा पोपट!

पाटणा : पोपट केवळ माणसाच्या बोलण्याची नक्कलच करू शकतो असे नाही. आफ्रि कन ग्रे पॅरोटच्या प्रजातीमधील एक पोपट तर गणितंही सोडवू शकत होता. अनेक पोपटांचे थक्क करणारे वेगवेगळे कौशल्य सातत्याने समोर येत असते. आता अशाच एका पोपटाचा व्हिडीओ बिहारमधून समोर आला आहे. हा पोपट खेळण्यातील पियानो चोचीने वाजवत असताना यामध्ये दिसतो!

या व्हिडीओत म्हटले आहे की पोपटाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. आपल्या पिंजर्‍यातून बाहेर येऊन त्याने स्वतःच केक कापला. त्यानंतर त्याने हा पियानोही वाजवून दाखवला. हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करण्यात आला आहे. त्यामध्ये दिसते की हा पोपट एका टॉय पियानोवर बसून चोचीने तो वाजवत आहे. त्यामधून सुमधूर संगीतही ऐकू येत आहे. अर्थातच हा व्हिडीओ लगेच व्हायरलही झाला आणि लोकांच्या प्रतिक्रियांचा पाऊसही पडला. कुणाला पियानो शिकायचा असेल तर या पोपटाशी संपर्क साधा, असेही गंमतीने म्हटले गेले!

Back to top button