Food : ‘या’ आहाराने शरीराला मिळते लोह | पुढारी

Food : ‘या’ आहाराने शरीराला मिळते लोह

नवी दिल्ली : तुम्ही सकाळी उठल्यानंतर तुम्हाला उत्साह वाटत नसेल किंवा तुम्हाला दिवसभर अशक्त आणि थकल्यासारखे वाटत असेल, तर ही अ‍ॅनिमियाची लक्षणे असू शकतात. ही समस्या शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे उद्भवते. आहारात (Food)बदल करून तुम्ही यापासून सुटका करु घेऊ शकता.

छातीत दुखणे, डोकेदुखी, चक्कर येणे आणि हृदयाची वारंवार धडधड होत असेल तर तुमच्या शरीरात लोहाची कमतरता असू शकते. ही समस्या पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त असू शकते. म्हणूनच तुम्ही तुमच्या आहारावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. तज्ज्ञांच्या मते, आयर्न किंवा लोह हे खनिज रक्तातील ऑक्सिजनच्या पुरवठ्यासाठी प्रथिने, हिमोग्लोबिन योग्य ठेवते. शरीरातील आयर्नची कमतरता दूर करण्यासाठी सुके मनुके, द्राक्षांचा ज्यूस उपयुक्त ठरतो. सुके मनुका खाल्ल्याने शरीराला लोहासोबतच भरपूर पोटॅशियम मिळते. तसेच रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

शरीरातील लोहाचे प्रमाण वाढवण्यासाठी सफरचंद, केळी आणि डाळिंब यांसारख्या फळांचेही सेवन लाभदायक ठरते. या फळांमध्ये लोहाचे प्रमाण थोडे कमी असते. परंतु त्यामध्ये फायबर आणि प्रथिने यांसारखे इतर पोषक घटक देखील असतात, जे शरीराला तंदुरुस्त ठेवण्यास मदत करतात. पालकचे सेवन शरीरात लोहाच्या पुरवठ्यासाठी सर्वोत्तम स्रोत मानले जाते. शिवाय बीट, मटार, ब्रोकोली किंवा अन्य काही हिरव्या भाज्यांही लाभदायक ठरतात. शेंगदाणे, बिन्स, मासेही लोह मिळवण्यासाठी उपयुक्त आहेत.

-हेही वाचा

Star : तार्‍याला गिळत असलेले कृष्णविवर

Biggest Roti : जगातील सर्वात मोठी रोटी!

Back to top button