Biggest Roti : जगातील सर्वात मोठी रोटी! | पुढारी

Biggest Roti : जगातील सर्वात मोठी रोटी!

अहमदाबाद : खाण्या-पिण्याच्या वस्तूंबाबतही अनेक विश्वविक्रम बनवले जात असतात. आपल्या देशातही असे अनेक विक्रम बनलेले आहेत. त्यामध्येच ‘जगातील सर्वात मोठी रोटी’ (Biggest Roti) बनवण्याच्या विक्रमाचाही समावेश मआहे. गुजरातमध्ये अशी सर्वात मोठी रोटी बनवण्यात आली होती.

जामनगरच्या हापामधील जलाराम मंदिरात अशा प्रकारची रोटी (Biggest Roti) नेहमीच बनवली जात असते. मात्र तब्बल 145 किलो वजनाच्या रोटीने विश्वविक्रमच बनवला. ही रोटी भाजण्यासाठी खास धातूचा तवा बनवण्यात आला होता. या मंदिरात जलाराम बापा यांच्या जयंतीनिमित्त अशी रोटी बनवली जाते. तीन महिला मिळून ही रोटी बनवतात व त्यासाठी दीड ते दोन तासांचा वेळ लागतो. रोटी बनल्यानंतर तिचे वजन साठ किलोपेक्षाही अधिक असते. 2012 मध्ये बनवण्यात आलेल्या 145 किलो वजनाच्या रोटीची नोंद ‘गिनिज बुक’मध्ये झाली.

हेही वाचा : 

Back to top button