Tractor running on liquid methane : डिझेल नव्हे, चक्क गायीच्या शेणाने चालेल ट्रॅक्टर! | पुढारी

Tractor running on liquid methane : डिझेल नव्हे, चक्क गायीच्या शेणाने चालेल ट्रॅक्टर!

लंडन : हल्ली शेतीची मशागत करताना पारंपरिक पद्धतीचा फारसा अवलंब होत नाही. बैलगाडी आणि लाकडी नांगराऐवजी ट्रॅक्टरचा वापर केला जातो. मात्र, पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे ही यांत्रिक मशागत शेतकर्‍यांसाठी खर्चिक ठरते. ही बाब लक्षात घेऊन न्यू हॉलंड या कंपनीने द्रवरूप मिथेनवर चालणारा नवीन ट्रॅक्टर (Tractor running on liquid methane) लाँच करण्याचा विचार केला आहे. याच्या वापरामुळे शेतकर्‍यांचे महागड्या डिझेलवर खर्च होणारे पैसे वाचणार आहेत. शिवाय, शेतीची कामे करताना ट्रॅक्टरमधून होणारे कार्बन उत्सर्जनही थांबवता येणार आहे. विशेष म्हणजे, गायीच्या शेणापासून ट्रॅक्टरसाठी आवश्यक असलेला मिथेन सहजपणे तयार करता येऊ शकतो. त्यामुळे उद्योगांसाठी एक चांगले सर्क्युलर आर्थिक मॉडेल उपलब्ध होईल.

बेन्नमन या ब्रिटिश कंपनीने ट्रॅक्टरमधील टेक्नॉलॉजी विकसित केली आहे. ही कंपनी एक दशकाहून अधिक काळ बायोमिथेन उत्पादनांवर संशोधन आणि विविध उत्पादनांचा विकास करत आहे. द्रवरूप मिथेनवर चालणारा (Tractor running on liquid methane) हा 270 हॉर्स पॉवर क्षमतेचा ट्रॅक्टर नियमित डिझेलवर चालणार्‍या ट्रॅक्टरच्या बरोबरीने काम करू शकतो, असा दावा करण्यात आला आहे.

या ट्रॅक्टरचे इंधन मिळवण्यासाठी, फार्मबेस्ड बायोमिथेन (Tractor running on liquid methane) स्टोरेज युनिटमध्ये साधारण 100 गायींच्या कळपातील टाकाऊ पदार्थांचे फ्युजिटिव्ह मिथेन नावाच्या इंधनात रूपांतर करता येऊ शकते. ट्रॅक्टरवर बसवलेली क्रायोजेनिक टाकी मिथेनला -162 डिग्री सेल्सिअस तापमानात द्रव स्वरूपात ठेवते. त्यामुळे वाहनाला डिझेलइतकी शक्ती मिळते आणि कार्बन उत्सर्जनात लक्षणीय घट होते.

कॉर्नवॉलमधील एका शेतात घेण्यात आलेल्या पायलट टेस्टिंगदरम्यान हा ट्रॅक्टर नियमित ट्रॅक्टरच्या गतीने चालत असल्याचे सिद्ध झाले. या ट्रॅक्टरचा वापर करून एका वर्षात कार्बन डायऑक्साईड (Tractor running on liquid methane) उत्सर्जन 2,500 मेट्रिक टनांवरून 500 मेट्रिक टनांपर्यंत कमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. बेन्नमनचे सहसंस्थापक ख्रिस मन म्हणाले, ‘टी 7’ लिक्विड मिथेन-इंधनयुक्त ट्रॅक्टर हा मिथेनवर चालणारा जगातील पहिलाच ट्रॅक्टर आहे. जागतिक कृषी उद्योगाला डिकार्बनाइज करण्यासाठी आणि सर्क्युलर अर्थव्यवस्था साकार करण्याच्या दिशेने हे आणखी एक पाऊल आहे.

हेही वाचा : 

Back to top button