iPhone : समुद्रात पडलेला फोन एक वर्षानंतरही सुरू! | पुढारी

iPhone : समुद्रात पडलेला फोन एक वर्षानंतरही सुरू!

लंडन : कोणताही फोन पाण्यात पडल्यावर अर्थातच काळजी निर्माण होते. ‘वॉटर-रेझिस्टंट’ फोन पाण्यात पडल्यावर काही मर्यादेपर्यंतच सुरक्षित राहतो. पण, एखादा फोन (iPhone) एका वर्षापर्यंत पाण्यात राहिला, तर काय होईल, असा प्रश्न तुम्हाला नक्की पडला असेल. असाच काहीसा प्रकार आयफोनबाबत घडला आहे. विशेष म्हणजे, हा फोन पाण्यात पडून एक वर्षाचा कालावधी झाल्यानंतरही व्यवस्थित सुरू होता.

बारा महिने समुद्राच्या पाण्यात राहिल्यानंतरही (iPhone) आयफोन व्यवस्थित सुरू झाला, अशी माहिती एका अहवालाच्या माध्यमातून समोर आली आहे. आयफोन वॉटर रेझिस्टंट रेटिंगसोबत मिळतात. परंतु, याचीही मर्यादा असते. म्हणजेच खूप खोल पाण्यात फोन पडल्यानंतर आणि अधिक वेळ झाल्यानंतर आयफोन आणि इतर फोनची रेटिंग काम करत नाही. मात्र, पाण्यात पडलेला आयफोन एका वर्षांनतर सुरक्षित आहे, हे पाहिल्यावर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. ही घटना यूकेमध्ये घडली आहे. सन यूकेच्या रिपोर्टस्ने दिलेल्या माहितीनुसार, एका ब्रिटिश महिलेचा आयफोन एक वर्षांपूर्वी समुद्रात पडला होता; पण जेव्हा तो फोन महिलेला परत मिळाला त्यावेळी तिला धक्काच बसला. कारण, एका वर्षापासून समुद्राच्या पाण्यात असलेला फोन चांगल्या पद्धतीत काम करत होता. हॅम्पशायर येथील महिलेचा हा फोन आहे.

2021 मध्ये जेव्हा ती महिला पँडल बोर्डिंग करत होती, त्यावेळी समुद्रात तिचा (iPhone) फोन पडला होता. त्यानंतर हा फोन ब्रॅडली नावाच्या एका व्यक्तीला मिळाला आणि त्यांनी महिलेला याबाबत सांगितले. फोन मिळाल्यानंतर त्यांना विश्वासच बसत नव्हता. आयफोन एका वॉटर प्रूफ बॅगमध्ये होता; पण तो समुद्राच्या खोल पाण्यातही सुरक्षित राहिला, हे पाहून महिलेला धक्काच बसला. या आयफोनची बॅक साईड पूर्णपणे खराब झाली आहे, तरीही हा फोन ऑन होत असून व्यवस्थित काम करत आहे.

हेही वाचा : 

Back to top button