चीन आणि रशियाचे लढाऊ विमान दक्षिण कोरियाच्या हवाई क्षेत्रात घुसले, तिन्ही देशांतील तणाव वाढला | पुढारी

चीन आणि रशियाचे लढाऊ विमान दक्षिण कोरियाच्या हवाई क्षेत्रात घुसले, तिन्ही देशांतील तणाव वाढला

पुढारी ऑनलाइन डेस्क : चीन आणि रशियाच्या लढाऊ विमानांनी विना परवानगी दक्षिण कोरियाच्या हवाई क्षेत्रात प्रवेश केला आहे. याबाबत दक्षिण कोरियाच्या योनहाप समाचार एजेंसी ने ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफच्या हवाल्याने याबाबत माहिती दिली आहे.

योनहाप ने म्हटले आहे की चीनचे दोन तर रशियाचे सहा लढाऊ विमान कोणतीही पूर्व सूचना न देता दक्षिण कोरियाच्या हवाई सीमेत प्रवेश केला आहे.

सियोलच्या जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफने सांगितले की, चिनी H-6 बॉम्बरने पहाटे 5:50 च्या सुमारास दक्षिण आणि ईशान्य किनार्‍यावरून हवाई संरक्षण क्षेत्रात प्रवेश केला आणि बाहेर पडला. काही तासांनंतर, ही विमाने जपानच्या समुद्रातून हवाई संरक्षण क्षेत्रात पुन्हा दाखल झाली, असे ते म्हणाले. यामध्ये Tu-95 बॉम्बर आणि Su-35 फायटर जेटसह रशियन युद्ध विमानांचा समावेश होता. दरम्यान, या घटनांमुळे तिन्ही देशांतील तणाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

हे ही वाचा :

‘होय, मीच मारले श्रद्धाला’; पॉलिग्राम चाचणीतून आफताबने दिली हत्येची कबुली

‘चला जाणू या नदी’ अभियान : सात नद्यांची जबाबदारी प्रांताधिकार्‍यांच्या खांद्यावर

Back to top button