Ashwini Vaishnaw | डिजिटल अर्थव्यवस्थेत १ कोटी नोकऱ्यांच्या संधी! केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन; डिजिटल अर्थव्यवस्थेचे तीन स्तंभ असलेल्या इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन, आयटी आणि आयटी सेवा तसेच स्टार्टअप्स क्षेत्रात सुमारे ८८-९० लाख नोकऱ्या आधीच तयार झाल्या आहेत. या क्षेत्रात येत्या दोन वर्षात १ कोटी नोकऱ्यांचा टप्पा पार करणे हे सरकारचे लक्ष्य आहे, अशी माहिती केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव (Ashwini Vaishnaw) यांनी दिली आहे. नॅशनल कॉन्क्लेव्ह बिल्डिंग द नेक्स्ट युनिकॉर्नच्या (National Conclave Building the next Unicorn) उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रीय स्टार्ट-अप कॉन्क्लेव्ह आज ३० नोव्हेंबर रोजी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आले आहे.
IT आणि ITES क्षेत्रात ५५ लाख थेट रोजगार निर्माण झाले आहेत. इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्रात ३० लाख आणि स्टार्टअप्समध्ये ८ लाख नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. २०२४ पर्यंत केंद्र सरकारने या क्षेत्रांतील रोजगारांचा आकडा १ कोटीवर नेण्यासाठी नियोजन केले असल्याचे अश्विनी वैष्णव यांनी म्हटले आहे.
भारताचे उत्पादन क्षेत्र कायद्याने जखडले होते. पंतप्रधानांनी एकामागून एक अडथळे दूर केले. गेल्या ८ वर्षांत १५०० हून अधिक कायदे रद्द केले गेले. यामुळे प्रमुख उद्योगांत उत्पादन वाढले असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील उद्योग क्षेत्राचे लोकशाहीकरण केले आहे. यामुळे आता उद्योजक होण्यासाठी कोणत्याही लोकांना विशिष्ट एका आडनावाची गरज नसल्याचे वैष्णव (Ashwini Vaishnaw) म्हणाले.
At National Conclave #BuildingthenextUnicorn, Hon. @GoI_MeitY Sh @AshwiniVaishnaw highlighted 55 lakh direct jobs have been created in IT/ITES sector, 30 lakh in electronics manufacturing & 8 lakh in startups. By 2024, the govt. is planning to cross 1 crore job opportunities. pic.twitter.com/OgbHXYkvcH
— STPI (@stpiindia) November 30, 2022
हे ही वाचा :
- गुड न्यूज: लिपीक-टंकलेखक पदांची सर्वांत मोठी भरती एप्रिलमध्ये, जानेवारीत निघणार जाहिरात
- SSC GD Constable 2022 : जीडी कॉन्स्टेबलच्या ४५ हजार पदांसाठी भरती, आजच करा अर्ज