अमेरिकेतील पोलिस वापरणार आता किलर रोबो | पुढारी

अमेरिकेतील पोलिस वापरणार आता किलर रोबो

सॅन फ्रान्सिस्को : गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्यासाठी सन फ्रान्सिस्को पोलिस विभागाने नुकताच एक प्रस्ताव तयार केला. जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर अत्यंत घातक ऑपरेशनमध्ये मिलिटरी स्टाईल रोबोंच्या वापरास परवानगी मिळणार आहे. प्रस्तावात नमूद करण्यात आले आहे की, ज्यावेळी जनता अथवा अधिकार्‍यांच्या जीवाला धोका निर्माण होईल, तेव्हाच शेवटचा पर्याय म्हणून या घातक रोबोंचा वापर करण्यात येईल.

उल्लेखनीय म्हणजे सॅन फ्रान्सिस्को पोलिस विभागाकडे सध्या रिमोट कंट्रोलवर संचलित होणारे 17 रोबो आहेत. हे रोबो प्रामुख्याने बॉम्ब निष्क्रिय करण्यासाठी वापरले जातात. यातील सध्या 12 रोबो कार्यरत आहेत. या रोबोंचा सध्या विशेष परिस्थितीत वापर केला जातो. मात्र, हेच रोबो आता गुन्हेगारांना पकडणे, वॉरंट बजावणे व संशयास्पद परिस्थितीत वापर करण्याबाबत त्यांना ट्रेनिंग देण्याची परवानगी सॅन फ्रान्सिस्को पोलिस विभागाकडून मागण्यात येत आहे.

घातक कामांसाठी रोबोंचा वापर हा काही नवा नाही. मात्र, 21 व्या शतकाच्या सुरुवातीपासूनच बहुतेक देशांची लष्करे ड्रोन सिस्टमच्या वापरावर विश्वास दाखवत आहेत. तर 2016 मध्ये डल्लासच्या पोलिसांनी एका पाकिर्र्ंगमध्ये लपलेल्या सशस्त्र शूटरला मारण्यासाठी बॉम्ब निरोधक रोबोचा वापर केला होता.

दरम्यान, सॅन फ्रान्सिस्को पोलिसांक डे असलेल्या शॉटगन अ‍ॅटॅचमेंट रोबो मशिनला 50 कॅलिबर अँटी मटेरियल रायफल घेऊन जाण्यास सक्षम बनविले जाऊ शकते.

Back to top button