भविष्यात दिसतील पायलटलेस विमाने | पुढारी

भविष्यात दिसतील पायलटलेस विमाने

कॅलिफोर्निया : सेल्फ ड्रायव्हिंग कार आणि ड्रायव्हरलेस मेट्रोनंतर जग आता पायलटलेस पॅसेंजर विमानाच्या दिशेने वाटचाल करू लागले आहे. एव्हिएशन कन्सल्टंट कंपनी ‘एआयए’ आणि ‘अ‍ॅव्हासेंट’च्या अंदाजानुसार भविष्यात ‘सेल्फ एअरक्राप्ट’चा बाजार वर्षाला 25 टक्के वेगाने वाढण्याची शक्यता आहे. 2040 पर्यंत हा बाजार 325 बिलियन डॉलर्सच्या घरात पोहोचेल.

अमेरिकेच्या कॅलिफोर्नियातील बे एरियामधील ‘एक्स विंग’ व ‘रिलायबल रोबोटिक्स’ आणि बोस्टनमधील ‘बर्लिन लॅब्स’ यासारख्या कंपन्या ‘पायलटलेस प्लेन’चे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने वेगाने काम करत आहेत. अनेक स्टार्टअप कंपन्याही या दिशेने काम करत असतानाच जगातील बड्या कंपन्या ‘एअरबस’ आणि ‘बोईंग’ या सध्या इनोव्हेशनच्या प्रयत्नात आहेत. एअरबसने 350 एअरलाईनर सिस्टीमला डेमोस्ट्रेशन दिले आहे. जे अ‍ॅटोमॅटिक पद्धतीने पार्क, टेकऑफ व लँड करू शकेल.

दरम्यान, एक्सविंग व रिलायबल रोबोटिक्सच्या एका प्रयोगादरम्यान ऑपरेटरने एअरट्रॅफिक कंट्रोलच्या संपूर्ण संचार व्यवस्थेला जमिनीवरूनच नियंत्रित केले. खास बाब म्हणजे हा ऑपरेटर थेटपणे विमान उडवित नव्हता तर सिम्पल ग्राफिक इंटरफेसच्या माध्यमातून विमान उड्डाण करण्याच्या सूचना जमिनीवरूनच देत होता. या तंत्रज्ञानात भविष्यात आणखी सुधारणा होऊन ‘पायलेटलेस’ विमानाचे स्वप्न सत्यात उतरण्यास मदत मिळणार आहे.

Back to top button