वाघाच्या बछड्याला बाटलीने दूध पाजवणारा ओरांगऊटान | पुढारी

वाघाच्या बछड्याला बाटलीने दूध पाजवणारा ओरांगऊटान

जकार्ता ः वन्यप्राण्यांच्या अनाथ पिल्‍लांचे संगोपन करणारे अनेक लोक आहेत. मात्र, एखाद्या ओरांगऊटानला वाघाच्या बछड्याला बाटलीने दूध पाजवत असताना कधी पाहिले आहे का? इंडोनेशियामध्ये ओरांगऊटान या एप वानरांची संख्या मोठी आहे. एका प्राणीसंग्रहालयातील अशाच एका ओरांगऊटानचा हा व्हिडीओ आता सोशल मीडियातही व्हायरल होत आहे.

इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसेजचे अधिकारी सम्राट गौडा यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये दिसते की वाघाची काही बछडी या ओरांगऊटानभोवती खेळत आहेत. त्यापैकी एका बछड्याला हे ओरांगऊटान मांडीवर बसवून त्याला बाटलीने दूध पाजवत आहे. या बछड्यांना ते हाताने गोंजारत असल्यासारखेही दिसते.

आपल्या आईजवळ ही बछडी ज्या सहजतेने वावरतील त्याप्रमाणेच या ओरांगऊटानजवळही वावरत असताना दिसते. ही बछडी ओरांगऊटानच्या अक्षरशः अंगाखांद्यावर खेळत असताना दिसून येतात. अतिशय वात्सल्याने हे ओरांगऊटान त्यांच्याबरोबर खेळते. त्यांना उचलून गोंजारते व आपल्या डोक्यावरही बसवते! अर्थातच लोकांना हा व्हिडीओ अतिशय आवडला. एका यूजरने लिहिले, खूपच छान…माणूस यांच्यापासून कधी शिकणार? या व्हिडीओला हजारो व्ह्यूज मिळाले.

Back to top button