लातूर : कारच्या भीषण अपघातात उदगीरचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे यांचा मुलगा ठार | पुढारी

लातूर : कारच्या भीषण अपघातात उदगीरचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे यांचा मुलगा ठार

औसा; पुढारी वृत्तसेवा : औसा तालुक्यातील आशिव पाटीजवळ कार आणि पिकअपचा भीषण अपघात झाला. या अपघातात उदगीरचे माजी नगराध्यक्ष राजेश्वर निटूरे यांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (दि.९) पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. तर या अपघातात कारमधील अन्य दोघे जण किरकोळ जखमी झाले.

नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या आशिव पाटी येथे भाजीपाल्याची वाहतूक करणारा टेम्पो नादुरुस्त अवस्थेत उभा होता.  या महामार्गावरून सोलापूरहून लातूरकडे प्रसाद निटूरे कारने (एमएच २४ एएस १६००) जात होते. यावेळी या कारची पिकअपला पाठीमागून जोराची धडक बसली. यात प्रसाद निटूरे गंभीर जखमी होऊन जागीच गतप्राण झाले. तर त्यांच्यासोबतचे अन्य दोघे जण किरकोळ जखमी झाले. महामार्गावरील नागरिकांनी तत्काळ जखमींना लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रसाद निटूरे यांना रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.

हेही वाचा :

Back to top button