Jalgaon Crime : किरकोळ वादातून एकाचा खून, आठ जणांविरोधात गुन्हा | पुढारी

Jalgaon Crime : किरकोळ वादातून एकाचा खून, आठ जणांविरोधात गुन्हा

जळगाव : पुढारी वृत्तसेवा-चाळीसगाव तालुक्यातील सुंदर नगर या ठिकाणी गटारी स्वच्छतेवरुन वाद झाला. यावेळी मारहाणीत 55 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. याप्रकरणात आठ संशयितांविरोधात मेहुणबारे पोलिसांत खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव तालुक्यातील सुंदरनगर तांडा क्रं. 1 येथील रहिवासी खंडू पंडीत मोरे (29) यांच्या घरासमोर असलेल्या नालीच्या पाण्याची सफाई त्यांच्या आईने केली होती. त्याचा राग आल्याने संशयित दीपक भावसिंग माळी व अशोक भावसिंग माळी या दोघा भावांनी खंडू मोरे यांना शिवीगाळ केली. आपल्याला शिवीगाळ का केली याचा जाब विचारण्यासाठी खंडू मोरे हे दीपक माळी याचे काका उत्तम लाला माळी यांच्याकडे गेले. खंडू मोरे आणि लाला माळी हे दोघे आपसात बोलत असतांना संशयित दीपक भावसिंग माळी, अशोक भावसिंग माळी, श्रीकांत माळी, प्रल्हाद, आदित्य माळी, दिपकचा भाचा असे सर्वजण खंडू मोरे यांच्या अंगावर धावून आले. खंडू मोरे यांना होत असलेली मारहाण बघून त्यांची आई, बहिण आणि वडील पंडीत मोरे असे तिघेजण वाद सोडवण्यास आले. दीपक भावसिंग माळी व अशोक भावसिंग माळी या दोघा भावांनी त्यांच्या हातातील लाकडी दांडक्याने पंडीत मोरे यांना मारहाण सुरू केली. त्यात ते गंभीर जखमी झाले. पंडीत मोरे यांना होणारी मारहाण बघून खंडू मोरे यांची बहिण भांडण सोडवण्यास आली. त्यावेळी लक्ष्मीबाई माळी व सिमा बागुल या दोघींनी खंडू मोरे यांच्या बहिणीला पकडून ठेवत धक्काबुक्की व शिवीगाळ केली. या घटनेदरम्यान कुणीतरी धारदार शस्त्राने पंडीत मोरे आणि खंडू मोरे यांच्या बहिणीच्या पाठीवर वार केले. त्यात पंडीत मोरे यांचा वैद्यकीय उपचारादरम्यान मृत्यू झाला. तपास सहाय्यक निरीक्षक संदीप परदेशी करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button