

रोहे ; महादेव सरसंबे रोहा शहरातील धनगर आळी येथील (२४ वर्षीय) तरुणाच्या घरी विविध शस्त्रांचा साठा व शस्त्र तयार करायला लागणारे साहित्य सापडले आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. बंदुका, रिव्हॉल्वर, तलवार, लोखंडी काती, जिवंत काडतुसे, चॉपर, यासह शस्त्र तयार करण्यासाठी लागणारे साहित्य, जंगली जनावरांची शिंगे यात सांबर, भेकर, काळवीटची शिंगे सापडली आहेत. शस्त्रसाठयाबरोबर जंगली जनावरांची शिंगे सापडली आहेत. सोमवार ८ जानेवारी रोजी रात्री स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगडने ही कारवाई केली आहे.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा रायगड ने सोमवार ८ जानेवारीच्या मध्यरात्री कारवाई केली असून, या कारवाईत ५ बंदूक, १ रिव्हॉल्वर, 39 काडतुसे, 3 तलवारी, 5 लोखंडी काती, 1 चॉपर, 5 चाकू, 1 किलो वजनाचे 24 दारूगोळा पाकिटे, शिशाचे छोटे बॉल, जनावरांची शिंगे यामध्ये जंगली जनावर भेकर 14 जोड, सांभर 5 जोड, काळवीट 1 जोड, चौसिंगा 2 जोड अशा प्रकारे या जंगली जनावरांची शिंगे सापडली आहेत. यासह कोयता, बंदूक तयार करायला लागणारे साहित्य आदी सापडले आहेत.
हेही वाचा :