नाशिक : घराचे उडाले पत्रे; तान्हुल्यासह कशीबशी काढली रात्र | पुढारी

नाशिक : घराचे उडाले पत्रे; तान्हुल्यासह कशीबशी काढली रात्र

सर्वतीर्थ टाकेद : पुढारी वृत्तसेवा
तालुक्याच्या पूर्व भागात अवकाळी पावसासह गारपीट झाल्याने शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले. अडसरे खुर्द, भंडारदरावाडी येथे

वादळी वा-यासह गारपीिटीने अचानक घराचे छत उडून गेले. यात सर्व कुटुंब उघड्यावर पडले. लहानग्या बाळासह कसेबसे जीव मुठीत धरुन रात्र काढली. घर सावरण्यासाठी झालेल्या नुकसानीची शासनाने त्वरीत नुकसानभरपाई द्यावी. – सुनीता बाळू साबळे. 

शेतकर्‍यांचे घराचे पत्रे उडून गेले. त्यामुळे झोळीत असलेले अकरा दिवसांचे तान्हुले बाळदेखील उघडे पडले. वादळी वार्‍यासह पावसामुळे अडसरे खुर्द येथील शेतकरी बाळू लक्ष्मण साबळे यांच्या घराचे छत उडून गेले. लोखंडी अँगल वाकून, घराचे पत्रे फुटले. गुरे-वासरांची पडवीदेखील उघडी पडली. झोळीत असलेले अकरा दिवसांचे तान्हुले बाळदेखील उघडे पडले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी साबळे कुटुंबाने एक रात्र पावसात कसाबसा आधार घेत काढली. यात घरातील धान्यासह मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची सरपंच, पोलिसपाटील, ग्रामसेविका उषा राठोड यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. भंडारदरावाडी येथील दगडू सखाराम साबळे यांच्या घराचेही छत उडून गेले. नुकसानीचे पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तत्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी सर्वत्र परिसरातील शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

इगतपुरीच्या पूर्व भागात वादळी वा-यासह बेमोसमी पावसामुळे गारपिटीने झालेल्या नुकसानीचे त्वरीत पंचनामे करण्याचे आदेश स्थानिक तलाठी, ग्रामसेवक यांना देण्यात आले आहे. नुकसानीचे पंचनामे करुन त्वरीत नुकसानभरपाई अहवाल पाठिवला जाणार आहे. – परमेश्वर कासुळे, तहसीलदार.

हेही वाचा:

Back to top button