PM Narendra Modi: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी भारताकडे मागितली मदत; पीएम मोदींना पत्र | पुढारी

PM Narendra Modi: युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी भारताकडे मागितली मदत; पीएम मोदींना पत्र

पुढारी ऑनलाईन: रशिया आणि युक्रेनधील युद्ध अजूनही सुरूच आहे. दरम्यान युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी भारताकडे (PM Narendra Modi) मदत मागितली आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित भारताकडे वैद्यकीय मदत मागितली आहे, असे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले आहे.

सध्या युक्रेनचे उप परराष्ट्रमंत्री एमिन झापरोवा या सध्या चार दिवसाच्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांनी राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलस्की यांचे पत्र भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाकडे सुपूर्द केले आहे. युक्रेनच्या पहिल्या  उप परराष्ट्रमंत्री एमिन झापरोवा यांनी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचे पत्र भारताच्या परराष्ट्र राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांच्याकडे सुपूर्द (PM Narendra Modi) केले आहे. या पत्राच्या माध्यमातून झेलेन्स्की यांनी युक्रेनला ओषधे आणि वैद्यकीय उपकरणांसह अतिरिक्त मानवी मदत देण्याची विनंती केली आहे. युक्रेनच्या या मागणीवर मीनाक्षी लेखी यांनी आश्वासन देणारे ट्विट केले आहे.

रशिया आणि युक्रेन युद्धानंतर युक्रेनच्या उप परराष्ट्रमंत्री एमिन झापरोवा या प्रथमच भारत दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी रशिया सोबत सुरू असलेले युद्धातून मार्ग काढण्यासाठी आणि ते थांबवण्यासाठी भारताने मदत करावी, अशी इच्छा व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान त्यांनी युक्रेनला पाठिंबा देणारा भारत खरा विश्वगुरू असल्याचेही याप्रसंगी म्हटले आहे.

हेही वाचा:

Back to top button