लोकसभा निवडणूक : भेंडी, मिर्ची, चप्पल, बूट, बांगड्यांसह १९० मुक्त चिन्हे | पुढारी

लोकसभा निवडणूक : भेंडी, मिर्ची, चप्पल, बूट, बांगड्यांसह १९० मुक्त चिन्हे

ठाणे : दिलीप शिंदे

भेंडी, हिरवी मिर्ची, अदरक, सिमला मिर्ची, फणस, आइसक्रीम, बादली, तळण्याची कढई, मटार , प्रेशर कुकर, भुईमूग, जेवणाचे ताट, कचरा पेटी, चप्पल, बूट, ल्युडो, क्लिप, केक, झगा, फोन चार्जर, बांगड्या, नूडल्स वाडगा , द्राक्षे, पाव आदी भाजीपाला, अन्नपदार्थ, वस्तू ह्यांना आपल्या जीवनात अनन्यसाधारण महत्व आहे. याच वस्तू लोकसभा उमेदवारांचे निवडणूक चिन्ह असतील, असा विचार कधी सामान्य मतदारांच्या मनाला स्पर्श करीत नाही. पण अशा तब्बल १९० वस्तू, अन्नपदार्थ हे निवडणुकीची चिन्हे म्हणून अपक्ष उमेदवारांना निवडणूक आयोगाकडून दिली जाणार आहेत.

लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरु असून उमेदवारांचे अर्ज भरण्याची धावपळ सुरु होते. पक्षांनी उमेदवारी नाकारल्यानंतर काही इच्छुक उमेदवार हे लोकसभा निवडणूक लढवीत आहेत तर अनेकांच्या पक्षांना निवडणूक आयोगाची मान्यता नसल्याने त्यांचे निवडणूक चिन्ह आरक्षित ठेवण्यात आलेले नाही. राज्यात भाजप, काँग्रेस, आप, बसपा, राष्ट्रवादी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शिवसेना, शिवसेना ठाकरे गट, मनसे, कम्युनिस्ट पार्टी आदी राष्ट्रीय आणि राज्य स्तरीय पार्टीचे चिन्हे आरक्षित ठेवण्यात आले आहेत. उर्वरित उमेदवारांना मुक्त चिन्हे दिली जाणार आहेत.

आपल्या आवडीच्या काही चिन्हांची मागणी केल्यानंतर आयोगाकडून उमेदवारांना चिन्हे वितरित केले जातात. त्यात चप्पल, पोळपाट लाटणे, बादली सह अनेक भाज्यांची चिन्हे आहेत. भेंडी, गवार, हिरवी मिर्ची, सिमला मिर्ची, चप्पल, फणस, आइसक्रीम, बादली, तळण्याची कढई, मटार , शिट्टी, प्रेशर कुकर, ल्युडो क्लिप, केक, झगा, फोन चार्जर, नूडल्स वाडगा , द्राक्षे, पाव एअर कॅन्डिशनर, कपाट, सायकल पंप, कॅमेरा, कोट, दरवाज्याचे हॅन्डल, ऊस शेतकरी, वाळूचे घड्याळ, जेवणाचा डब्बा, पेनाचे निप, पंचिंग मशीन, जहाज, झोपाळा, दुर्बीण, कॅन, नारळाची बाग, ड्रिल मशीन, गॅस सिलिंडर, काडेपेटी, पेन स्टॅन्ड, रेझर, बूट, सफरचंद, बिस्कीट , कलर ट्रे आणि ब्रश, डंबेज, गॅस शेगडी, पाणी गरम करणारा रॉड, माईक, पेन्सिलचा डबा रेफ्रिजरेटर, शेटर. ऑटो रिक्षा, फळा , गालिचा,. संगणक, कचरा पेटी, भेटवस्तू, इस्त्री, मिक्सर . पेन्शील शार्पनर, अंगठी, सितार, बेबी वॉकर,मनुष्य व शीड युक्त नाव, कॅरम बोर्ड, संगणक माउस, कानातील रिंगा, नागरिक, पेन्डूलम, रोड रोलर, उडी मारणारी दोरी, फुगा, पेटी, फुलकोबी,खाट , विजेचा खांब, काचेचा पेला, किटली, नेल कटर, मुसल आणि खलबत्ता, यंत्रमाग, पाटी, सीसीटीव्ही कॅमेरा, क्रेन, लिफाफा, ग्रामोफोन, किचन सिंक, गळ्याची टाय, पेट्रोल पंप, रूम कुलर, साबण दाणी, फळांची टोपली, ब्रेड टोस्टर, साखळी, घन, एक्स्टेन्शन बोर्ड, फोन चार्जर, रूम हिटर, मोजे, बॅट , विटा, चक्की,कटिंग प्लिर्स, बासरी, लेडी पर्स, उशी, रबर स्टॅम्प, सोफा, फलंदाज, ब्रिफ केस, हिरा, फुटबॉल खेळाडू, हात गाडी, लॅपटॉप, पॅन्ट , करनी, सेफ्टी पिन, स्पेनर , टॉर्च, ब्रश, डिझेल पंप, कारंजा, हार्मोनियम, कडी, करवत, स्टॅपल. मोत्यांचा हार, बेल्ट, बाकडा, कॅल्क्युलेटर, बुद्धिबळ पट, चिमणी, क्लिप, डिश अँटिना, डोली, दरवाजाची घंटी, तळण्याची कढई, नरसाळे, हेडफोन, हेल्मेट,हॉकी अँड बॉल,पत्रपेटी,लायटर, नासपती,मटार,पेन ड्राइव्ह, प्लेट स्टँड , हंडी,प्रेशर कुकर, शाळेचे दप्तर, कात्री , शिवण यंत्र, स्टेसपोस्कोप , स्टूल, स्टॅम्प्स, टोलर, टॉफीज, चिमटा, भाला फेक, व्हायलन, तंबू, टायर्स, टेनिस रॅकेट, दूरदर्शन, खिडकी, ट्यूब लाईट, ट्रक, इंजेक्शन, टूथ ब्रश, जहाज. लोकर ऍण्ड सुई आदी मुक्त चिन्हे उपलब्ध करून देण्यात आली आहेत.

हेही वाचा : 

Back to top button