महापुरुषांच्या अवमानकारक वक्तव्यावरुन काँग्रेसकडून चंद्रकांत पाटील यांचा निषेध | पुढारी

महापुरुषांच्या अवमानकारक वक्तव्यावरुन काँग्रेसकडून चंद्रकांत पाटील यांचा निषेध

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य करणाऱ्या उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचा शहर काँग्रेस व युवक काँग्रेसच्यावतीने निषेध करण्यात आला. शुक्रवारी (दि.9) सायंकाळी औरंगपुरा येथील सरस्वती भुवन महाविद्यालयातील कार्यक्रम आटोपून निघताना युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी ‘चंद्रकांत पाटील मुर्दाबाद…’, ‘माफी मागा, माफी मागा..’ अशा घोषणा देत निषेध व्यक्त केला.

काँग्रेसचे शहराध्यक्ष शेख युसूफ यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी चंद्रकांत पाटील यांचा निषेध व्यक्त केला. भाजप नेते सतत महापुरुषांचा अवमान करून समाजाबांधवांच्या भावना दुखावत आहेत. पाटील यांनी त्यांचे शब्द मागे घ्यावेत, माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सागर नागरे, एनएसयुआय पदाधिकारी दीक्षा पवार यांनी पाटील यांच्या वाहनाच्या ताफ्यासमोर घोषणाबाजी केली. पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन क्रांतीचौक पोलीस ठाण्यात नेले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची कार्यवाही सुरू होती.

मतांची भीक मागणाऱ्यांना काय बोलावं डॉ. कल्याण काळे

अलीकडे काही जणांच्या मेंदू आणि जिभेच्यामध्ये असणाऱ्या तारा तुटल्या असाव्यात, असे त्यांची वक्तव्ये ऐकून वाटते. शिव, शाहू, फुले, आंबेडकर यांच्या नावावर मतांची भीक मागणारे त्यांचा अपमान करत असल्याचे पाहून वाईट वाटते. याचे उत्तर त्यांना हा स्वाभिमानी महाराष्ट्र दिल्याशिवाय राहणार नाही.

शिव, शाहू, फुले, आंबेडकर जर नसते तर आजचा महाराष्ट्र घडलाच नसता. भाजपाच्या लोकांमध्ये महापुरुषांच्या बाबत बदनामीकारक वक्तव्य करण्याची स्पर्धाच लागली आहे. यांच्या नांग्या वेळीच ठेचायला हव्या, अशी प्रतिक्रिया जिल्हाध्यक्ष डॉ. कल्याण काळे यांनी मंत्री चंद्रकात पाटील यांच्या वक्तव्याचा निषेध करताना दिली.

.हेही वाचा

शाळा सुरू करण्यासाठी महापुरूषांनी भीक मागितली; चंद्रकांत पाटील यांचे वादग्रस्त विधान

रत्नागिरी : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला सक्तमजुरीची शिक्षा

लव्ह जिहाद संदर्भात लवकरच नवा कायदा : देवेंद्र फडणवीस 

Back to top button