औरंगाबाद : शिवना टाकळी प्रकल्प ९६ टक्के भरला; शेतकर-यांची चिंता मिटली | पुढारी

औरंगाबाद : शिवना टाकळी प्रकल्प ९६ टक्के भरला; शेतकर-यांची चिंता मिटली

हतनूर (औरंगाबाद), पुढारी वृत्‍तसेवा : कन्नड तालुक्यातील सर्व धरणे भरले असून, हतनूर परिसरातील शिवना टाकळी प्रकल्प९५.६२ टक्क्यांनी भरला आहे. सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाने तालुक्यातील धरणे तुडूंब भरली आहेत. त्यामुळे परिसरातील शेतक-यांची पाण्याची चिंता मिटली आहे.

शिवना टाकळी प्रकल्पचा पूर्ण संचय पाणी पातळी ५६१.८० द.घ.मी इतका पाणी साठ्याची क्षमता असलेल्या  प्रकल्पांमध्ये आतापर्यंत ५५१.८० द.ल.घ.मी. इतका पाणीसाठा झाला आहे. यापैकी आजचा उपयुक्त पाणीसाठा ३४.८५१ (द.ल.घ.मी) म्हणजे ९५.६२ टक्के एवढा भरले आहे. यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्‍याने सर्व धरणे काठोकाठ भरली आहेत. त्यामुळे या परिसरातील शेतक-यांची चिंता मिटली आहे.

रब्बीसाठी लाभदायी

सलग तिसऱ्या वर्षी  ही प्रकल्प भरला आहे. यंदाही पाणीसाठा उपलब्ध असल्याने आगामी रब्बी हंगामात सिंचनासाठी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

शिवना टाकळी मध्यम प्रकल्प

जोत्याची पाणी पातळी =५५१.८० दलघमी.
पूर्ण संचय पाणी पातळी =५६१.८०दलघमी
प्रकल्पीय पूर्ण संचय क्षमता (दलघमी) =३९.३६६
आजची पाणी पातळी=५६१.६०(दलघमी)
आजची जल क्षमता=३७.७६८(दलघमी)
आजचा उपयुक्त पाणीसाठा=३४.८५१ (दलघमी)
पाणी टक्केवारी=९५.६२%
सांडवा=(०)

हेही वाचा :

Back to top button