खुर्ची वाचविण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून राज्य पणाला: खासदार सुप्रिया सुळे यांचा आरोप | पुढारी

खुर्ची वाचविण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून राज्य पणाला: खासदार सुप्रिया सुळे यांचा आरोप

बारामती; पुढारी वृत्तसेवा: नवीन सरकार येऊन अडीच महिने झाले, अद्याप जिल्ह्यांना पालकमंत्री नाहीत. रुसवे-फुगवे आहेत. 50 खोके घेतले असल्याने त्यांना काम करण्याची गरज वाटत नाही, अशा शब्दांत खासदार सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारवर निशाणा साधला. खुर्ची वाचविण्यासाठी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री राज्य पणाला लावत असल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला. बारामतीत त्या पत्रकारांशी बोलत होत्या. पितृपंधरवडा सुरू असल्याने अनेक मंर्त्यांनी पदभार स्वीकारला नाही, या प्रश्नावर त्या म्हणाल्या, मला याबद्दल फारशी माहिती नाही. सरकार येऊन अडीच महिने झाले. त्यांना कामच करायचे नाही.

बारामती किंवा पुणे जिल्हाच नव्हे, तर महाराष्ट्राविरोधात सातत्याने एक षड्यंत्र होत असल्याचा आरोप सुळे यांनी केला.
सरकार येऊन अडीच महिने झाले तरी अनेक मंत्री अजून त्यांच्या कार्यालयात गेले नाहीत. जिल्हा नियोजन मंडळाचे पैसे खर्च होत नाहीत. राज्यातील विकासकामे ठप्प आहेत. महाराष्ट्राला गुजरातपेक्षा पुढे नेऊ, असे उपमुख्यमंत्री म्हणाले आहेत, आम्ही त्याची वाट बघत असल्याचे त्या म्हणाल्या.

पहिली ते चौथीपर्यंतच्या गृहपाठासंबंधी सरकार बदल करू इच्छित असले, तरी त्यासाठी त्यांनी तज्ज्ञांची मते घ्यावीत. कोरोना काळात विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना त्यातील तज्ज्ञांशी बोलणे आवश्यक आहे. मी सरकारशी यासंबंधी बोलणार असल्याचे सुळे यांनी सांगितले.

बिबट सफारीबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बारामतीत होणारा बिबट सफारी प्रकल्प रद्द करीत असून, तो जुन्नरला होणार असल्याचे टि्वट केल्याच्या प्रश्नावर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बारामती व जुन्नर या दोन्ही ठिकाणी हा प्रकल्प होणार होता. अर्थमंत्री असताना अजित पवार यांनी त्यासाठी निधीची तरतूद केली होती. परंतु, हा प्रकल्प रद्द केला असेल, तर यासंबंधी अजित पवार यांच्यासोबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली

Back to top button