पिंपरी : चोरीचा जाब विचारल्याने मोबाईल हिसकावला | पुढारी

पिंपरी : चोरीचा जाब विचारल्याने मोबाईल हिसकावला

पिंपरी : बांधकामावरील सेंट्रिंग प्लेट चोरून नेणार्‍या चोरट्याला जाब विचारला असता त्याने मोबाईल देखील हिसकावून नेला. ही घटना गुरुवारी (दि. 25) सायंकाळी ताजणेमळा, चर्‍होली बुद्रुक येथे घडली. बाळासाहेब साहेबराव बनसोडे (52, रा. ताजणेमळा, चर्‍होली बुद्रुक) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीने बांधकामावरून 65 हजारांच्या सेंट्रिंग प्लेट चोरून नेल्या. त्यावेळी फिर्यादी यांनी आरोपीचा पाठलाग केला. दरम्यान, फिर्यादी यांनी मालक प्रकाश धिवार यांना फोन करून बोलावून घेतले. धिवार यांनी आरोपीला प्लेट घेऊन जाण्याबाबत जाब विचारला असता चोरट्याने धिवार यांचा पाच हजारांचा मोबाईल हिसकावून नेला.

 

Back to top button