औरंगाबाद : नारायणगाव येथे पोळ्याच्या सणानिमित्त बैल धुण्यासाठी गेलेल्या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू | पुढारी

औरंगाबाद : नारायणगाव येथे पोळ्याच्या सणानिमित्त बैल धुण्यासाठी गेलेल्या तरुणाचा नदीत बुडून मृत्यू

पैठण; पुढारी वृत्तसेवा : पैठण तालुक्यातील नारायणगाव येथे पोळा सणानिमित्त बैल धुण्यासाठी नदीत उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू झाला. बाळू रामनाथ गवळी (वय २५) असे त्याचे नाव आहे. ही घटना आज (दि.२५ ) दुपारी घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी पोळा सण असल्याने बैल धुण्यासाठी बाळू गवळी आज दुपारी गावाजवळच्या नदीवर गेला होता. बैल धुताना पाण्याचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. घरी न आल्यामुळे कुटुंबातील सदस्यांनी त्याचा शोध घेतला असता त्याचा मृतदेह नदीत तरंगताना आढळून आला. त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा :

Back to top button