Earth-Moon : पृथ्वीपासून लांब जातोय चंद्र; ६० हजार किमीने वाढले अंतर | पुढारी

Earth-Moon : पृथ्वीपासून लांब जातोय चंद्र; ६० हजार किमीने वाढले अंतर

पुढारी ऑनलाईन : रात्रीच्यावेळी आकाशात चंद्राला बघून तुम्हाला कधीच जाणवणार नाही की, पृथ्वीचा उपग्रह असलेला चंद्र हा त्याच्यापासून हळूहळू लांब जात आहे. तुम्हाला हे ऐकूण आश्चर्य वाटेल पण हे नवीन संशोधनातून समोर आले आहे. संशोधकांनी असे म्हटले आहे की, २.५ अब्ज वर्षांत चंद्र आणि पृथ्वीमधील (Earth-Moon) अंतर हे ६० हजार किलोमीटरने वाढले आहे.

Space.com ने द कॉन्व्हर्सेशन रिपोर्टचा हवाला देत म्हटले आहे की, युट्रेच विद्यापीठ आणि जिनिव्हा विद्यापीठातील संशोधक आपल्या सौरमालेच्या भूतकाळाबद्दल जाणून घेण्यासाठी अनेक तंत्रांचा वापर करत आहेत. या शास्त्रज्ञांनी पृथ्वीवरील वेस्टर्न ऑस्ट्रेलियात एक जागा शोधली आहे, ज्या ठिकाणाहून चंद्राच्या अनेक वर्षांपासूनचा इतिहास उलगडा जात आहे. या ठिकाणी करिजिनी नॅशनल पार्क आहे ज्या ठिकाणी काही अब्ज वर्षांपूर्वीच्या टेकड्या आहेत. ज्या विशिष्ट प्रकारच्या गाळाने वेगळ्या केल्या आहेत. हा गाळामध्ये लोह आणि सिलिका असलेल्या खनिजांच्या विशिष्ट थरांचा समावेश असलेल्या लोखंडी रचना आहेत. जे कधी काळी समुद्राकाठावर जमा होत होता. आता हे पृथ्वीवरील सर्वात जुन्या भागामध्ये अशी रचना पाहायला मिळते.

तज्ज्ञांच्या संशोधनानुसार, भूतकाळात पृथ्वीसोबत बरेच काही घडले असावे. संशोधकांनी या खोऱ्यांच्या तपासणीवरून आणि त्यांच्या गणनेवरून असा अंदाज लावला आहे की २.५ अब्ज वर्षांपूर्वी चंद्र आणि पृथ्वीमधील अंतर ६० हजार किलोमीटरपेक्षा कमी असेल. संशोधकांचे म्हणणे आहे की, आजचे पृथ्वी आणि चंद्र यांच्यातील अंतर हे ३८४,४०० किमी आहे, ते अडीच अब्ज वर्षांपूर्वी ३२१,८०० किमी होते आणि दिवसाची लांबी २४ तासांऐवजी १६.९ तास होती. संशोधकांचे म्हणणे आहे की अब्जावधी वर्षांपूर्वी चंद्र प्रत्यक्षात आपल्या ग्रहाच्या जवळ होता आणि आता तो हळूहळू पृथ्वीपासून (Earth-Moon) लांब जात आहे.

१९६९ मध्ये यूएस स्पेस एजन्सी NASA च्या अपोलो मिशनने चंद्रावर परावर्तित पॅनेल स्थापित केले होते. ज्याने असे दर्शवले होते की, चंद्र सध्या पृथ्वीपासून दरवर्षी ३.८ सेमी लांब जात आहे. याच गतीने आपण जर मागे गेलो, तर अंदाजे १.५ अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वी आणि चंद्र यांच्यात टक्कर झाली असावी. यावरून चंद्राची निर्मिती ही सुमारे ४.५ अब्ज वर्षांपूर्वी झाली आहे. याचा अर्थ असा होतो की, सध्याची माहिती ही अब्जावधी वर्षाची असल्याने ही मार्गदर्शन करण्यासाठी खूप तुटपुंजी आहे. मात्र, शास्त्रज्ञांच्या या नवीन संशोधनामुळे पृथ्वी-चंद्र प्रणाली (Earth-Moon) समजण्यास नक्कीच मदत होऊ शकणार आहे.

हेही वाचा:

Back to top button