चंद्रावर ‘या’ ठिकाणी राहू शकतो माणूस!

चंद्रावर ‘या’ ठिकाणी राहू शकतो माणूस!
Published on
Updated on

न्यूयॉर्क : चंद्रावरील संभाव्य जीवनासंदर्भात दीर्घकाळापासून संशोधन सुरू आहे. यासंदर्भातील नव्या संशोधनात मात्र सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. या संशोधनातील माहितीनुसार चंद्रावरील काही भागांत असे तापमान आहे की, त्यामध्ये माणूस आरामात राहू शकतो. अशा स्थितीत चंद्रावरील संभाव्य जीवनाची शक्यता बळावू लागली आहे.

'डीडब्ल्यू'च्या अहवालानुसार चंद्रावर असलेल्या काही गुहांमध्ये अशा रचना आहेत की, त्या भविष्यात मानवाचे संरक्षण करू शकतील. संशोधनात असेही सांगण्यात आले आहे की, चंद्रावर असे काही खड्डे व गुहा आहेत की, तेथील तापमान पृथ्वीसारखेच आहे. 'युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया'च्या शास्त्रज्ञांच्या मतानुसार चंद्रावरील या खड्डे आणि गुहांमध्ये 17 अंश सेल्सिअस इतके तापमान आहे.

दरम्यान, चंद्रावरील तापमान वारंवार बदलत असते. पृथ्वीच्या या नैसर्गिक उपग्रहावरील अनेक ठिकाणी दिवसाचे तापमान 260 अंश सेल्सिअस इतके असते. मात्र, तेच रात्रीच्या सुमारास शून्य ते उणे 280 अंश सेल्सिअसपर्यंत घसरते. मात्र, काही ठिकाणी तापमान स्थिर असते. यामुळे भविष्यात जीवनाची संभावना वाढू शकते. ज्या खड्डे व गुहांच्या ठिकाणी तापमान कमी असते, तेथे धोकादायक किरणे आणि लहान उल्कापिंडापासूनही मानवाचे संरक्षण होऊ शकते. चंद्रावरील एक दिवस अथवा रात्र ही पृथ्वीच्या दोन आठवड्यांपेक्षा जरा जास्त अवधीची असते. यामुळे तेथे राहणे माणसासाठी अत्यंत अवघड बनू शकते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news