लोकसभा निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ | पुढारी

लोकसभा निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकसभा निवडणूकीच्या निकालानंतर  कर्नाटक सरकारने पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ केली आहे. कर्नाटक सरकारने आज शनिवारी (दि.15) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ केली. सरकारच्या निर्णयानंतर कर्नाटकात पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 3 रुपयांनी तर डिझेलच्या दरात 3.05 रुपयांनी वाढ झाली आहे. ही दरवाढ मध्यरात्री 12 वाजल्यापासुन करण्यात येणार आहे.

इंधनाच्या करवाढीमुळे दरवाढ

कर्नाटक राज्य सरकारच्या सुचनेनुसार, पेट्रोलवर 25.92% कर होता. तो आता वाढून 29.84% करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे डिझेलवर 14.3% इतका कर होता. आता तो वाढवून 18.4% करण्यात आला आहे. या इंधन दराच्या वाढीनंतर बंगळुरूमध्ये पेट्रोलचा दर 99.84 रुपये प्रति लिटर आणि डिझेलचा दर 85.93 रुपये प्रति लिटर झाला आहे. या इंधनातील दर वाढीनंतर नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

हेही वाचा :

Back to top button