ICC T20 WC : वरूण राजाच्या खेळीमुळे भारत-कॅनडा सामना रद्द | पुढारी

ICC T20 WC : वरूण राजाच्या खेळीमुळे भारत-कॅनडा सामना रद्द

फ्लोरिडा; वृत्तसंस्था : भारत-कॅनडा यांच्यातला टी-20 वर्ल्डकप स्पर्धेतील सामना पावसामुळे रद्द करावा लागला. त्यामुळे दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण दिले गेले आणि टीम इंडिया 7 गुणांसह सुपर-8 मध्ये पोहोचली. कॅनडाने 4 सामन्यांत 3 गुणांसह स्पर्धेचा निरोप घेतला. या ‘अ’ गटातून अमेरिका हा सुपर-8 मध्ये पोहोचणारा दुसरा संघ आहे.

‘अ’ गटात अव्वल स्थान पटकावल्यानंतर भारतीय संघ शनिवारी कॅनडाविरुद्ध खेळणार होता. फ्लोरिडा येथे हा सामना होणार होता. तेथे शुक्रवारी अमेरिका व आयर्लंड यांच्यातला सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. त्यामुळे पाकिस्तानचे स्पर्धेतील पॅकअप निश्चित झाले. त्यामुळे भारत-कॅनडा लढतीवर पावसाचे सावट होते. सायंकाळी 7 वाजेपर्यंत खेळपट्टीवरील कव्हर्स काढले गेले नव्हते; परंतु पावसाने विश्रांती घेतली होती. नाणेफेकीलाही विलंब झाला. सामनाधिकारी व अम्पायर यांनी मैदानाची पाहणी केल्यानंतर नापसंती दर्शवली आणि 9 वाजता पुन्हा पाहणी केली गेली आणि हा सामना रद्द झाल्याची घोषणा झाली.

सुपर-8 चे वेळापत्रक :

20 जून – अफगाणिस्तान वि. भारत, किंग्स्टन ओव्हल : रात्री 8 वा.
20 जून – ऑस्ट्रेलिया वि. बांगला देश , नॉर्थ स्टँड : पहाटे 6 वा.
22 जून – भारत वि. बांगला देश, नॉर्थ स्टँड : रात्री 8 वा.
22 जून – अफगाणिस्तान वि. ऑस्ट्रेलिया, किंग्स्टन : पहाटे 6 वा.
24 जून – ऑस्ट्रेलिया वि. भारत, सेंट ल्युसिया : रात्री 8 वा.
24 जून – अफगाणिस्तान वि. बांगला देश, किंग्स्टन : पहाटे 6 वा.

Back to top button