Ind vs Eng 3rd Test Ravindra Jadeja : मायदेशात जडेजा @ 200, ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पाचवा गोलंदाज | पुढारी

Ind vs Eng 3rd Test Ravindra Jadeja : मायदेशात जडेजा @ 200, 'अशी' कामगिरी करणारा ठरला पाचवा गोलंदाज

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : टीम इंडियाचा अष्‍टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने आज (दि.१८) आपल्‍या नावावर आणखी एका विक्रमाची नोंद केली. राजकोट कसोटीत त्‍याने इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सला तंबूत धाडत भारतीय भूमीवर २०० बळींचा टप्‍पा पूर्ण केला. अशी कामगिरी करणारा तो पाचवा भारतीय गोलंदाज ठरला आहे. ( Ravindra Jadeja become 5th player to claim 200 Test wickets in India )

मायदेशात झालेल्‍या कसोटी सामन्‍यांमध्‍ये कंसात बळींची संख्‍या : अनिल कुंबळे (350), रविचंद्रन अश्विन (347), हरभजन सिंग (265) आणि कपिल देव (219) यांच्यानंतर रवींद्र जडेजा याने 200 कसोटी बळीचा टप्‍पा पूर्ण केला आहे. जडेजाने भारतासाठी ७० कसोटी सामन्यांमध्ये आतापर्यंत २८२ बळी घेतले आहेत, तसेच ३,००५ धावाही केल्या आहेत. ( Ravindra Jadeja become 5th player to claim 200 Test wickets in India )

राजकोट कसोटीत जडेजाचे धडाकेबाज शतक

टीम इंडियाचा अव्वल क्रमांकाचा अष्टपैलू अशी ओळख असणार्‍या रवींद्र जडेजा राजकोट कसोटीत पहिल्या डावात १२५ चेंडूंत ९ चौकार आणि २ षटकारांसह ११२ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माच्‍या पाठोपाठ जडेजानेही शतकी खेळी गेल्‍याने या सामन्‍यात पहिल्‍या डावात भारताने ४४५ धावांपर्यंत मजल मारली. या खेळीमुळे तो इंग्लंडविरुद्ध 1000 कसोटी धावा करणारा 15 वा भारतीय फलंदाज ठरला आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button