Ravindra Jadeja : धोनीला मागे टाकून रवींद्र जडेजाची मोठी झेप!

Ravindra Jadeja : धोनीला मागे टाकून रवींद्र जडेजाची मोठी झेप!

Published on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Ravindra Jadeja : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात दुसरी कसोटी खेळली जात आहे. पहिली कसोटी जिंकून टीम इंडियाने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या प्रमाणे दुसऱ्या कसोटीतही भारताच्या फलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. यशस्वी जैस्वाल, रोहित शर्मा, रवींद्र जडेजा आणि रविचंद्रन अश्विन यांनी अर्धशतकी खेळी केली. तर, विराट कोहलीने 500 व्या आंतरराष्ट्रीय सामन्यात इतिहास रचताना 121 धावा धावा फटकावत आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 76 वे शतक झळकावले. या शतकासाठी विराटची सर्वत्र चर्चा सुरू आहे., पण रवींद्र जडेजानेही उत्कृष्ट कामगिरी करत आपली दखल घेण्यास भाग पाडले आहे.

दुस-या कसोटीच्या पहिल्या दिवशीच्या दुसऱ्या सत्रात भारताने झटपट विकेट्स गमावल्यानंतर विराट कोहलीने रवींद्र जडेजासह संघाचा डाव सांभाळला. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 159 धावांची भागीदारी केली. विराटने 121 धावांचे योगदान दिले तर जडेजानेही 152 चेंडूत 61 धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. यासह त्याने टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीला मागे टाकले आहे. सहाव्या किंवा त्याखालील क्रमांकावर मैदानात उतरून सर्वात चांगल्या सरारीने फलंदाजी करण्याच्या बाबतीत आता जडेजाने थेट दुसरे स्थान पटकावले आहे.

सहाव्या किंवा त्याखालील क्रमांकावर सर्वोत्तम फलंदाजी सरासरी (किमान 2000 धावा)

51.80 – व्हीव्हीएस लक्ष्मण
38.51 – रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja)
37.73 – एमएस धोनी
36.19 – रवी शास्त्री
31.19 – कपिल देव

रवींद्र जडेजाचे फलंदाजी प्रदर्शन

रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) हा केवळ भारताचाच नाही तर जगातील अव्वल क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू आहे, गेल्या काही वर्षांत तो फलंदाज म्हणून अधिकाधिक लोकप्रिय होताना दिसत आहे. त्याने भारतासाठी 67 कसोटी सामने खेळले असून आतापर्यंत 98 डावात 2804 धावा केल्या आहेत. त्याची कारकिर्दीतील सरासरी 36.42 आहे परंतु 6 व्या क्रमांकावर किंवा त्यापेक्षा कमी फलंदाजी करताना त्याची सरासरी 38.51 आहे. जडेजाने चौथ्या क्रमांकावर फक्त एकदा तर पाचव्या क्रमांकावर 6 वेळा फलंदाजी केली आहे. शिवाय त्याने 6 व्या क्रमांकावर किंवा त्याखालील मैदानात उतरत 91 वेळा फलंदाजी केली आहे. या 91 डावांमध्ये त्याने आपल्या खात्यात 2696 धावा जमा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 3 शतके आणि 19 अर्धशतके झळकावली आहेत. या स्थानांवर त्याची सरासरी जगातील सर्वोत्तम फिनिशर एमएस धोनीपेक्षाही चांगली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news