दुखापतीचे ‘दुष्टचक्र’..! राफेल नदालची ऑस्ट्रेलियन ओपनमधून माघार | पुढारी

दुखापतीचे 'दुष्टचक्र'..! राफेल नदालची ऑस्ट्रेलियन ओपनमधून माघार

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : विक्रमी २२ वेळा ग्रँडस्‍लॅम पटकविणारा टेनिसपटू राफेल नदालने ऑस्ट्रेलियन ओपन स्‍पर्धेतून माघार घेतली आहे. ब्रिस्बेन इंटरनॅशनलमधील उपांत्यपूर्व फेरीतील पराभवादरम्यान त्याच्या स्नायूमध्ये दुखापत झाली.(Rafael Nadal injury ) विशेष म्‍हणजे, मागील वर्षी ऑस्‍ट्रेलियन ओपन स्‍पर्धेच्‍या दुसर्‍या फेरीतून बाहेर पडल्‍यानंतर नदालवर शस्‍त्रक्रिया झाली होती. दुखापतीतून सावरतआठवडाभरापूर्वी ब्रिस्बेन ओपनमध्ये त्‍याने पुनरागमनही केली मात्र पुन्‍हा गंभीर दुखापतीच्‍या चिंतेने त्‍याने खबरदारी म्‍हणून ऑस्‍ट्रेलियन ओपन स्‍पर्धेतून माघार घेतली आहे.

दुखापतीमुळे खेळापासून सुमारे एक वर्षानंतर पहिली स्पर्धा खेळणारा नदाल ब्रिस्बेन इंटरनॅशनलच्या उपांत्यपूर्व फेरीत सरळ सेटमध्ये विजयाच्या दिशेने वाटचाल करत होता. ३ तास २५ मिनिटे चाललेल्या सामन्यात त्‍याला पराभव पत्करावा लागला. थॉम्पसनने नदालचा ५-७, ७-६ (८/६), ६-३ असा पराभव केला. या सामन्‍यात दुसऱ्या सेटच्या टायब्रेकरमध्ये त्याचे दोन मॅच पॉइंट्स चुकल्याने दुखापतीने त्‍याला घेरले. ( Rafael Nadal injury )

Rafael Nadal injury : विश्रांती घेण्यासाठी स्पेनला परत जात आहे…

नदालने सोशल मीडियावर केलेल्‍या पोस्‍टमध्‍ये स्‍पष्‍ट केले आहे की, ब्रिस्बेनमधील माझ्या शेवटच्या सामन्यादरम्यान मला एका स्नायूमध्ये एक समस्या आली होती. मी मेलबर्नला पोहोचलो तेव्हा मला एमआरआय करण्याची संधी मिळाली. एका स्नायूवर सूक्ष्म झीज झाली, ज्या भागात मला दुखापत झाली होती त्याच भागात नाही आणि ही चांगली बातमी आहे. सध्या मी 5 सेट-सामन्यांमध्ये कमाल पातळीवर स्पर्धा करण्यास तयार नाही. म्हणून मी माझ्या डॉक्टरांना भेटण्यासाठी, काही उपचार आणि विश्रांती घेण्यासाठी स्पेनला परत जात आहे.
मी पुनरागमनासाठी वर्षभर खूप मेहनत घेतली आहे. मी नेहमी नमूद केल्याप्रमाणे 3 महिन्यांत माझ्या सर्वोत्तम स्तरावर राहण्याचे माझे ध्येय आहे, असेही नदालने स्‍पष्‍ट केले आहे.

“मेलबर्नमध्‍ये खेळता येणार नाही माझ्यासाठी दुःखद बातमी आहे.आम्ही सर्वच या हंगामासाठी सकारात्मक आहोत. मला इथे ऑस्ट्रेलियात खेळायचे होते . काही सामने खेळण्याची संधी मिळाली ज्याने मला खूप आनंदी आणि सकारात्मक केले. पाठिंब्याबद्दल सर्वांचे आभार आणि लवकरच भेटू!” असेही त्‍याने आपल्‍या पोस्‍टमध्‍ये नमूद केले आहे.

हेही वाचा : 

Back to top button