MS Dhoni Wimbledon : नदाल मारत होता, माही पाहत राहिला! विम्बल्डनमध्येही धोनीचा डंका | पुढारी

MS Dhoni Wimbledon : नदाल मारत होता, माही पाहत राहिला! विम्बल्डनमध्येही धोनीचा डंका

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आज ७ जुलै रोजी आपला ४१ वा वाढदिवस साजरा करत आहे. या निमित्ताने जगभरातून त्यांचे अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. धोनीने ४१ वा वाढदिवस साजरा करण्यापूर्वी लंडनमधील विम्बल्डनला भेट दिली. त्याचा एक फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो त्याच्या मित्रपरिवारासह सामन्याचा आनंद घेताना दिसत आहे. (MS Dhoni Wimbledon)

धोनी प्रेक्षक गॅलरीत बसून विम्बल्डन सामन्याचा आनंद लुटत होता, पण त्याच दरम्यान कॅमेरामनने त्याला आपल्या कॅमेऱ्यात कैद केले आणि पाहता पाहता त्याचा हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. विम्बल्डननेही महेंद्र सिंह धोनीचा हा फोटो त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून शेअर करत त्याला वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा दिल्या आहेत. यादरम्यान, विम्बल्डनने दिलेले कॅप्शन चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे. विम्बल्डन फोटो शेअर करत ‘हिंग्लिश’मध्ये म्हटलंय की, ‘नदाल मार रहा हैं, माही देख रहा हैं! हॅप्पी बर्थ डे एमएस धोनी! (MS Dhoni Wimbledon)

नदालची विम्बल्डन पुरुष एकेरीच्या सेमीफायनलमध्ये धडक

२२ ग्रँडस्लॅम विजेता राफेल नदालने विम्बल्डन पुरुष एकेरीच्या सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. पोटदुखीचा सामना करत असलेल्या नदालने ११ व्या मानांकित टेलर फ्रिट्झचा पराभव केला. त्याचे वडील प्रेक्षक गॅलरीतून नदालला कोर्ट सोडण्याचा इशारा करत होते. वडील आपली काळजी करत आहेत हे नदालने पाहिले पण त्याने सामन्यातून माघार न घेता कोर्टवर विजयाच्या निश्चयाने पाय रोवून उभा राहिला आणि सामना जिंकूनच बाहेर पडला. या वर्षी मार्चमध्ये फ्रिट्झने इंडियन वेल्सच्या अंतिम फेरीत नदालचा पराभव केला होता आणि अशा स्थितीत विम्बल्डनच्या उपांत्यपूर्व फेरीत फ्रिट्झ नदालला पराभूत करून मोठा पराभव करेल असा विश्वास चाहत्यांना होता, पण तसे झाले नाही. (rafael nadal wimbledon 2022 semifinal)

दुखण्यामुळे सर्वोत्तम फॉर्ममध्ये नसलेल्या नदालने ३-६, ७-५, ३-६, ७-५, ७-६ असा विजय मिळवला. विजयानंतर तो म्हणाला, ‘मला क्षणभर वाटले की मी सामना पूर्ण करू शकणार नाही.’ आता त्याचा सामना ऑस्ट्रेलियाच्या निक किर्गिओसशी होईल. किर्गिओसने चिलीच्या ख्रिश्चन गॅरिनचा ६-४, ६-३, ७-६ असा पराभव केला. त्याचवेळी दुसऱ्या सेमीफायनलमध्ये नोव्हाक जोकोविचचा सामना कॅम नॉरीशी होणार आहे. (rafael nadal wimbledon 2022 semifinal)

पहिला सेट गमावला, शेवटचे दोन्ही सेट जिंकले

३६ वर्षीय स्पॅनिश खेळाडू नदाल पहिल्या सेटमध्ये ३-१ ने पुढे होता. पण फ्रिट्सने सलग पाच गेम जिंकून सेट जिंकला. त्यानंतर पोटदुखीच्या त्रासामुळे नदालने कोर्ट सोडले. मात्र तो थोड्या वेळाने परतला. त्यानंतर नदालने दुसरा सेट ७-५ असा जिंकून सामना बरोबरीत आणला. त्यानंतर अमेरिकन स्टार फ्रिट्सने दुसरा सेट ६-३ असा जिंकून सामना रोमांचक केला. त्यानंतर नदालने सलग दोन सेट जिंकून (चौथा सेट ७-५ आणि पाचवा सेट ७-६) सेमीफायनल गाठली. (rafael nadal wimbledon 2022 semifinal)

महिलांच्या सेमीफायनलमध्ये २०१९ ची चॅम्पियन सिमोना हॅलेपची लढत अलेन रायबाकिनाशी होईल, तर ओन्स जबाऊरचा सामना तात्याना मारियाशी होईल. हालेपने अमांडा अ‍ॅनिसिमोव्हाचा ६-२, ६-४ असा पराभव केला, तर रायबाकिनाने अल्ला टोमजानोविचचा ४-६, ६-२, ६-३ असा पराभव केला.

Back to top button