Rahul : राहूलनं करून दाखवला ‘हा’ विक्रम; जो गेल, विराटला पण जमला नाही | पुढारी

Rahul : राहूलनं करून दाखवला 'हा' विक्रम; जो गेल, विराटला पण जमला नाही

पुढारी ऑनलाईन डेस्क : आयपीएलच्या १६ व्या हंगामात शनिवारी (दि. १५) दोन सामने खेळले गेले. यात पंजाब किंग्ज आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात फलंदाजी करताना लखनौचा कर्णधार के.एल. राहुलने आयपीएलच्या इतिहासात असा विक्रम केला जो आजपर्यंत कोणीही करू शकले नाही. हा विक्रम युनिवर्सल बॉस नावाने प्रसिध्द असलेला ख्रिस गेल आणि रनमशिन नावाने प्रसिध्द असलेला विराट कोहलीही हा विक्रम आपल्या नावावर करू शकले नाहीत. (Rahul)

राहुलने ‘हा’ जबरदस्त विक्रम केला आपल्या नावावर!

के.एल. राहुल आयपीएलच्या इतिहासात सर्वात जलद ४००० धावा करणारा पहिला फलंदाज ठरला आहे. त्याने पंजाब विरूध्द ३० धावा करताच त्याने हा विक्रम आपल्या नावावर केला. त्याने १०५ डावांत ४००० धावांचा टप्पा पूर्ण केला. याबाबतीत त्याने ख्रिस गेल आणि विराट कोहलीला मागे टाकले आहे. गेलने ११२ डावात हा पराक्रम केला होता तर, विराट कोहलीने १२८ डावांत ४००० धावांचा टप्पा पार केला होता. (Rahul)

राहूलच्या आयपीएल कारकिर्दीची आकडेवारी

के.एल. राहुलने आयपीएलमध्ये आतापर्यंत ११४ सामने खेळले आहेत, यामध्ये त्याने १३५.१६ च्या स्ट्राइक रेटने ४०४४ धावा केल्या आहेत. तसेच राहुलने आयपीएलमध्ये ४ शतके झळकावली असून त्याच्या नावावर ३२ अर्धशतकेही आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या १३२ धावांची आहे. आयपीएलमध्ये आत्तापर्यंत राहुलने ३४२ चौकार आणि १६६ षटकार मारले आहेत.

हेही वाचा;

Back to top button