Atiq Ahmed Shot Dead : गँगस्टर अतिक अहमदसह भाऊ अशरफची गोळ्या झाडून हत्या

Atiq Ahmed Shot Dead : गँगस्टर अतिक अहमदसह भाऊ अशरफची गोळ्या झाडून हत्या
Published on
Updated on

[web_stories title="true" excerpt="false" author="false" date="false" archive_link="true" archive_link_label="अधिक पहा…" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="10" order="ASC" orderby="post_date" view="circles" /]

प्रयागराज; पुढारी ऑनलाईन : प्रयागराज येथे वैद्यकीय उपचारासाठी नेत असताना गँगस्टर अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन ते तीन हल्लेखोरांनी अतिक आणि अशरफ यांच्यावर गोळीबार केला.

अतिकवर गोळ्या झाडणारे बदमाश हे मीडियावाले म्हणून आले होते. पोलिसांनी तिन्ही हल्लेखोरांना अटक केली आहे. गोळीबार केल्यानंतर हल्लेखोरांनी आत्मसमर्पण केले. अतिक आणि अश्रफ पोलिसांच्या ताब्यात होते. माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अश्रफ यांच्याबाबत आज पोलीस पथकाने अनेक ठिकाणी छापे टाकले होते. (Atiq Ahmed Shot Dead)

पोलिसांच्या पथकाने शहरातील चकिया, कासारी मासारी, पीपळ गाव परिसरात छापे टाकले. अतिक अहमद 2005 मध्ये झालेल्या बसपा आमदार राजू पालचे हत्याकांड आणि यावर्षी फेब्रुवारीमध्ये झालेल्या उमेश पाल याच्या हत्याकांडातही आरोपी होता. यापूर्वी, अतीकचा मुलगा असद अहमद १३ एप्रिल रोजी झाशीमध्ये झालेल्या पोलिसांच्या चकमकीत मारला गेला होता. शूटर गुलामसह यूपी एसटीएफने त्याचा एन्काउंटर केला होता.

या छाप्यात कासारी मासारी परिसरात पोलिसांनी दोन पिस्तुले आणि ५८ काडतुसे जप्त केली आहेत. त्यासोबत एक विदेशी पिस्तुल आणि एक भारतीय पिस्तुलही होते. जप्त करण्यात आलेल्या ५८ काडतुसांपैकी पाच पाकिस्तानी असून, अतिक आणि अश्रफ यांच्या सांगण्यावरून कासारी मसारी परिसरात ही शस्त्रे जप्त करण्यात आली.

[web_stories title="true" excerpt="true" author="true" date="true" archive_link="true" archive_link_label="" circle_size="150" sharp_corners="false" image_alignment="left" number_of_columns="1" number_of_stories="1" order="DESC" orderby="post_date" view="list" /]

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news