Monkey Business : पाकने गाढवे विकल्यानंतर चीनची श्रीलंकेत माकड खरेदी! | पुढारी

Monkey Business : पाकने गाढवे विकल्यानंतर चीनची श्रीलंकेत माकड खरेदी!

कोलंबो; वृत्तसंस्था : कर्जबाजारी पाकिस्तानकडून गाढव खरेदीनंतर चीन आता श्रीलंकेकडून टूक मकाक प्रजातीची एक लाख माकडे विकत घेणार आहे. चिनी कर्जाच्या विळख्यात अडकलेल्या श्रीलंकेने त्यासाठी तयारी दर्शविली आहे. चीनमधील विविध 1 हजार प्राणी संग्रहालयांकरिता ही माकडे चीनला हवी आहेत. या व्यवहारासाठी श्रीलंकेत एक समितीही स्थापन झाली आहे. (Monkey Business)

सरकारचे कथन, धोरण काय? (Monkey Business)

श्रीलंकेत माकडे उदंड झालेली आहेत. माकडांमुळे श्रीलंकेत होणारे पिकांचे (विशेषत: नारळ पीक) नुकसान 157 कोटींच्या घरात आहे.
श्रीलंकेने नुकतेच माकडांना संरक्षित प्राण्यांच्या यादीबाहेर काढले आहे. शेतकर्‍यांना माकडांना ठार मारण्याची मुभाही मिळाली आहे.

प्राणीप्रेमींचे हे आक्षेप…

  • चीनमध्ये माकडे संरक्षित प्राण्यांच्या यादीत नाहीत.
  • चीनमध्ये माकडांचे मांस खाल्ले जाते.
  • रेड डेटा बुकनुसार टूक मकाक ही माकड प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.

चीनचा माकड खरेदीचा उद्देश तपासावा. चिनी खरोखर ही माकडे प्राणीसंग्रहालयात ठेवणार आहेत, माकडांवर संशोधन करणार आहेत, की त्यांच्या मांसावर ताव मारणार आहेत?
– जगत गुणवर्धने,
पर्यावरणप्रेमी, श्रीलंका

अधिक वाचा :

Back to top button
प्राजक्ता खुलली साडीत; पाहा प्राजक्ताचे सुंदर फोटो OSCAR Award : ब्लॅक ड्रेसमध्ये दीपिकाचा जलवा आई कुठे काय करते फेम रुपाली भोसलेचे हटके फोटो प्रियंकाचे व्हाईट ड्रेसमधील ग्‍लॅमरस फोटो वयात काय ठेवलंय! ऐश्वर्या नारकरच्या अदा पाहून वय विसरून जाल रश्मिका बनली क्रिकेटर्सची क्रश; नेटकरी म्हणताच…. व्हाईट शॉर्ट वनपीसमध्ये हॉट झाली मौनी रॉय सर्वोत्कृष्ट ग्लॅमरस फेस ठरली रुपाली भोसले अनन्याने हॉट फोटोशूट करत उन्हाळ्यात वाढवला आणखी उष्मा बोल्ड आणि बिनधास्त सई
प्राजक्ता खुलली साडीत; पाहा प्राजक्ताचे सुंदर फोटो